कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावातील शेतकऱ्याच्या शेतातील पोल्ट्री फार्म मधून २५ कोंबड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ईश्वर लक्ष्मण कान्होरे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत आंबीखालसा येथे राहत आहेत व शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या शेतात गट क्र.३६३ मध्ये त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पोल्ट्री फार्मचा लोखंडी दरवाजा उघडून आत प्रवेश केला.व पोल्ट्री फार्म मधून २५ कोंबड्या चोरून पोबारा केला आहे.
दरम्यान सकाळी कान्होरे हे पोल्ट्री फार्म मधे गेले असता. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. कान्होरे यांनी थेट घारगांव पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहे.
दरम्यान पठार भागात भुरट्या चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोठी दहशत माजवली असून शेतकऱ्यांची अशी कोणतीच वस्तू नाही की ती चोरी करण्याची ठेवली आहे.शेतकऱ्यांच्या दुचाकी, चार चाकी,इलेक्ट्रिक मोटरी, केबली, स्टार्टर, तसेच उभ्या पिकातील डाळिंब, कांदे , शेळ्या अशा विविध प्रकारच्या चोऱ्या पठार भागात वारंवार घडत आहे. आता तर चोरट्यांने पोल्ट्री फार्म लक्ष करत थेट कोंबड्यांचीच चोरी केल्याने पोल्ट्री फार्म व्यावसायिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment