कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग मारुती काळे व चंद्रकला पांडुरंग काळे यांच्या शुभमंगल दिनाच्या ५० व्या वाढदिवसाची वर्षपुर्ती व अभिष्टचिंतन सोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला. यानिमित्त सोमनाथ व साईनाथ या दोन बंधूंनी ऋणनिर्देश व्यक्त केला आहे.
या निमित्ताने सकाळी विधीवत रुद्राभिषेक त्यानंतर कार्यक्रमस्थळी भागवताचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. तदनंतर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अभिष्टचिंतन सोहळा केक कापून साजरा करण्यात आला . स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
तर यावेळी ऋण व्यक्त करताना सोमनाथ व साईनाथ काळे म्हणाले की, आमच्या या कौटुंबिक सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान दिला व उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्या काळे परिवारावर प्रेम करणारा मित्रपरिवार, पै-पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ठ तसेच पठारभागातील ग्रामस्थ यांची आवर्जुन उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली. लोकनेते तथा पारनेरचे आमदार श्री. निलेश लंके यांचे पिताश्री श्री. ज्ञानदेव लंके (गुरुजी), अकोले विधानसभाचे आमदार श्री. किरणजी लहामटे (साहेब), संगमनेर तालुका शिवसेनाप्रमुख श्री. जनार्दन आहेर पा., ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकजी कार्ले साहेब, जि. प. अहमदनगर सदस्य श्री. अजयजी फटांगरे पा., पुणे शहर विभागीय पोलिस अधिकारी श्री. श्रीकांतजी क्षिरसागर साहेब, अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष श्री. सुनिलजी पंडित (सर), मा. सौ. सुनंदाताई भागवत, पेन्शनर्सचे संघटनेचे अध्यक्ष श्री. डोंगरे गुरुजी, राज्य प्राथमिक शिक्षक नेते श्री. अरुण आवारी (गुरुजी), श्री. दळवी सर, श्री. वसंत काळे, सौ. शोभा वाघ, श्री. सुपेकर सर, श्री. सुभाष मल्हारी आहेर पा., श्री. सुरेश कान्होरे पा., श्री. गोकुळ कहाणे गुरुजी, श्री. बाळासाहेब ढोले, श्री. राहुलशेठ गडगे, श्री. चैतन्य कहाणे, श्री. नितीनशेठ आहेर पा., श्री. तुळशिराम आण्णा भोर पा., श्री. सर्जेराव पा. ढमढेरे, श्री. विलासराव खंडागळे आदि मान्यवरांनी शुभेच्छा देताना आमच्या आई वडिलांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.काहीजणांना काही अपरिहार्य कारणामुळे इच्छा असुनसुद्धा कार्यक्रमाला येता आले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः घरी येऊन शुभेच्छा दिल्या. तसेच, बऱ्याच जणांनी फोन करुन तसेच सोशल मिडीयावर देखिल शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपलेच स्नेहाभिलाषी,
श्री. सोमनाथ पांडुरंग काळे
श्री. साईनाथ पांडुरंग काळे
तसेच समस्त काळे परिवार
Comments
Post a Comment