कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जांभळे गावात मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

 


कै. तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरणार्थ शिबिराचे आयोजन.


सतिश फापाळे


    अकोले तालुक्यातील पठार भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा जांभळे गावचे माजी सरपंच कै. तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरण निमित्ताने शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन स्वर्गीय तबाजी सबाजी गवांदे सेवाभावी संस्था जांभळे यांनी केले आहे.

      जांभळे गावच्या जडणघडणीत तसेच विकासात मोलाचे योगदान देऊन गावच्या विकासाचा पाया रोवणारे कै.तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात शनिवारी सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन,तर ९:३० वाजता अखंड महाराष्ट्रात प्रचलित असलेले ह.भ. प.अश्र्विनिताई म्हात्रे यांचे संगीत प्रवचन होणार आहे.तसेच ११ वाजता पासून एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय यांचे सौजन्याने तसेच डॉ बाळासाहेब ढोरे यांचे विशेष सहकार्याने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला सुरवात होणार आहे.

    या शिबिरात सर्व वयोगटातील व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.तपासणीत चष्म्याचा नंबर आलेल्या व्यक्तींना अल्प दरात चष्मा उपलब्ध करून दिला जाणार आहे.आवश्यक असल्यास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .मोतीबिंदू व्यतिरिक्त इतर नेत्रदोष आजार असलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी व उपचारासाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात येईल.असे मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु