कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

सतीश फापाळे
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा २०२३ चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार अकोले तालुक्यातील बदगी गावचे ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शिंगोटे यांना अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला आहे.
अहमदनगर येथील माऊली सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून प्रशांत शिंगोटे यांचे नेहमीच सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रात उत्तम कामगिरीतून मोठे योगदान राहिले आहे. याचं कार्याला मोठ्या स्वरूपात समाजापुढे आणण्यासाठी आणि आपण समाज्याचे काहितरी देणे लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी सन २०१७ रोजी ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ची स्थापना केली होती.
ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या, पुस्तके वाटप, त्याच बरोबर तंत्रज्ञानाच्या व संगणकाच्या युगात नाविन्यपूर्ण शिक्षणं पद्धतीचा चालना मिळावी यासाठी शैक्षणिक संस्थांना LED टिव्ही संच वाटप, आरोग्य केंद्र व उपकेंद्र याना वैद्यकीय साहित्य वाटप याच बरोबर कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना मदत करणे या सारखी कामे केली.तर विविध सामाजिक कार्याच्या बाबतीत संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. याच कार्याचा गौरव म्हणून शिंगोटे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे बाबासाहेब पावसे पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट बढे, शिवनेरी एक्स्प्रेस संपादक रामदास सांगळे,महाराष्ट्र पत्रकार संघाचे जुन्नर तालुका संघटक मनोहर पटाडे , वडगाव कांदळीचे सरपंच रामदास पवार, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,जुन्नर तालुक्यातील नामवंत कुस्ती पंच पै.सुरेश काकडे,सीए बाबू पवार, प्रगतशील शेतकरी विश्र्वास बढे, नवनाथ भोर, बदगी गावचे प्रगतशील शेतकरी शांताराम शेवकार आदी उपस्थित होते.
प्रशांत शिंगोटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment