कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

बोटा/ सतिश फापाळे
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा परीसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची घटना सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणें नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील विद्यानिकेतन महाविद्यालय परीसरात भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना दोन वर्षीय तरस मादीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या झालेल्या अपघातात तरस मादी जागीच ठार झाली आहे.
सदर घटना घारगांव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले यांच्या लक्षात येताच त्यांनी वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना याबाबतची माहिती दिली, माहिती समजताच ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ,दिपक वायळ आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरस मादिस कोठे गावच्या रोपवाटीकेत नेले.
दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वनक्षेत्र असल्याने भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अनेक बिबटे,तरस, वन्य प्राण्यांचा अपघात होऊन ठार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.या वन्य प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी महामार्गाच्या कडेला विविध उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी प्राणीमित्र करत आहे.
Comments
Post a Comment