कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

भरधाव वाहणाने १८ महिलांना चिरडलं.
५ ठार तर १३ गंभीर
सतिश फापाळे
पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला असून, एका भरधाव वाहणाने खरापुडी फाट्याजवळ महिलांच्या घोळक्याला उडवल आहे. तर या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १३ महिला जखमी झाल्या आहेत.जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.या घोळक्यात १८ महिला होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.
खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या १८ महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या महिला आल्या होत्या. मंगल कार्यालय दुसऱ्या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्या सर्वजणी रस्ता ओलांडत असताना पुण्याहून आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने या १८ महिलांच्या घोळक्याला जोरात धडक दिली.
या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी तातडीने मदत पुरवल्याने महिलांना लवकर उपचार मिळाले आहे.येथील नागरिकांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment