कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगांवातील गावठाण परीसरात राहत असलेल्या साठ वर्षीय व्यक्तीने राहत्या भाडोत्री खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की एकनाथ शंकर शिंदे (वय वर्ष ६०) हे घारगांवातील गुलाब नबी शेख यांच्या भाडोत्री खोलीत राहत होते. दुपारी त्यांच्या पत्नी जिजाबाई मेडीकलमधून गोळ्या औषधे आणण्यासाठी बस स्टॅण्डवरती गेल्या होत्या.त्या गोळ्या_औषधे घेऊन परत आल्या असता त्यांना घरात त्यांचे पती एकनाथ शिंदे यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने सिलींग फॅनला गळफास घेतला असल्याचे चित्र दिसले. हे चित्र पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला.जिजाबाई यांचा रडण्याचा आवाज ऐकून आजुबाजुच्या नागरीकांनी घटना स्थळावर धाव घेतली.
ग्रामस्थांनी या विषयीची माहिती घारगांव पोलिसांना दिली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पो. हे. कॉ. राजेंद्र लांघे, संतोष खैरे, किशोर लाड आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शिंदे यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.दरम्यान छाया भोसले यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहेत
Comments
Post a Comment