कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी पार पडला आगळावेगळा कार्यक्रम ....

 


 संगमनेर तालुक्यातील घारगांव येथे.19 फेब्रु.2023 रोजी एक आगळा वेगळा असा कार्यक्रम पार पडला. मरहूम (कै.) पापाभाई रसूल सय्यद यांचे  आंबी खालसा मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंब  असून त्यांना एकूण दहा दापत्य आठ मुली व दोन मुले.  त्यांना 18 मुले व 20 मुली आहेत. थोरली मुलगी मरहूम बन्नोबी अब्दुलकरीम शेख हिला आंबीखालसा या ठिकाण मरहूम अब्दुलकरीम सुलेमान शेख यांच्या बरोबर विवाह झाला त्यांचे मागील वर्षी फेब्रु 2022 मध्ये निधन झाले त्याच्या मुलांने सदरभाई शेख यांनी सध्या त्यांचे मावस भाऊ मुंबई, पुणे. औरंगाबाद, गोनेगाव ता. श्रीरामपूर, निमगाव सावा ता. जुन्नर, कुरकुंडी ता. संगमनेर, पोखरी ता. पारनेर या  ठिकाणी वास्तव्यास असलेले भावांचे कुटुंब त्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वांना एकत्र करण्याचे काम केले.व आंबीखालसा येथे बोलावून  सर्वांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. शिवाय  सर्वांसाठी खास जेवणाची मेजवानी ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमानंतर सर्वांची मिटिंग पार पडली त्या मध्ये कुणाच्या कुटुंबा मध्ये काही अडचण आहे का..? काही वादविवाद आहे का..? मुलां/मुलींच्या लग्नाच्या बाबतीत काही अडचण आहे का ? आर्थिक अडचणीच्या बाबतीत यावर  चर्चा झाली.व यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा निर्णय करण्यात आला. शिवाय जवळीक राहण्यासाठी प्रत्येक महिन्यात प्रत्येक मावस भावाकडे असा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे.पुढील महिन्याची तारीख श्री मुनीर बटाव पटेल पोखरी या ठिकाणी ठेवण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी अब्दुलकदार अब्दुलकरीम शेख (सेवानिवृत्त पी. डब्लू. डी.), हाजी युसूबभाई अब्दुल पटेल. मुंबई (सेवानिवृत्त ठाणे ) हुसेन शेखलाल पटेल (सेवानिवृत्त मुंबई म्युनि. कार्पो.) यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक शेख कमाल अब्दुलकरीम, सेवानिवृत प्रा. शिक्षक शेख दाऊत अब्दुलकरीम तसेच जुम्मादिन पठाण यांनी मोलाचं सहकार्य केले.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु