कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

चिखलठाण येथील नाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रा उत्सव थाटामाटात संपन्न

 


  ‌ शेख युनुस /.  राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेले श्री नाथ म्हस्कोबा नाथ महाराज यात्रा उत्सव हा दरसाल दरवर्षी सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येतो,यावर्षी नाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात भक्त भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.   

   श्री नाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रे ची सुरुवात ही आरतीने,पुजेने ढोल ताशेच्या गजरात आयोजित करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील भक्त भाविकांनी हजेरी लावली.    यावेळी प्रमुख उपस्थितीत           ‌महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे,धनराज गाडे पाटील,भारतशेठ भुजाडी, व नाथ म्हस्कोबा महाराज मंदिराचे भक्त महाराज माने सतुजी भगत बाबा या मान्यवरांची घोड्यावर बसून भव्य दिव्य थाटामाटात, ताल सुरात मिरवणूक काढण्यात आली. शेरी चिखलठाण येथील लोकप्रिय कार्यसम्राट लोकनियुक्त सरपंच डॉ .सुभाष काकडे, किसन काळनर,विनोद काळनर,इसाक सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते,उपसरपंच आबासाहेब काळनर,विजय डोमाळे,अशोक डोमाळे,सयाजी डोमाळे,अहमदनगर जिल्हा पत्रकार शेख युनुस, माने काळूशेठ,टुले पाटील, खेमनर पाटील, बाचकर पाटील डोलनर पाटील ,तमनर,केदार ,भुतांबरे आदी भक्त महिला पुरूष,मुलांनी लाखो संख्येने चिखलठाण येथील श्री नाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रे चा आनंद मोठ्या श्रध्देने व थाटामाटात संपन्न केला.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु