कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाल्याची घटना रवीवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर चालक वाजीद खान हा संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने त्याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एन एल ०१ ए एफ २९६६ हा घेऊन चालला होता दरम्यान तो माहुली परीसरातील घाटात आला असता त्याचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गालगत असणार्या साईड गटारीत पलटी झाला.यात कंटेनरचे नुकसान झाले तर वाजीद खान हा किरकोळ जखमी झाला.
दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ व टोल प्रशासनाने धाव घेतली रुग्णवाहिका चालक नागेश भोर व प्रवाश्यांनी जखमी खान याला तातडीने मदत करत रुग्णालयात हलवीले.
Comments
Post a Comment