Posts

Showing posts from May, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

Kya News चा भव्य दिव्य अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत संपन्न

Image
  Kya News चा भव्य दिव्य अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत संपन्न अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : आता संस्कृत भाषेमध्ये सुद्धा Kya News वर मिळणार बातम्यांचे अपडेट् आणि अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या Kya News (Know Your Area) या ऍपचा अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील शिर्डीत पार पडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी १०० हुन अधिक पत्रकारांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी Kya News च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या चारोळ्या. ...

*कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार*

Image
  कै.लालाशेठ बिहानी विद्यामंदीर प्रशालेत मोठ्या प्रमाणात फी आकारणी शिक्षण अधिकाऱ्याकडे केली तक्रार शेख युनूस अहमदनगर    चालु शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेश प्रक्रिया चालु झाल्या असुन राहुरी तालुक्यात नामांकित समज ल्या जाणाऱ्या कै लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याच्या पालकांकडुन डोनेशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फी आकारणी करत आहे त्या मुळे गोर गरीब विद्यार्थ्याचे पालक हवालदिल झाले आहेत शासनाने शैक्षणिक धोरण निश्चत केले असुन शालेय प्रवेश फी आकारणी बाबत परिपत्रका द्वारे अवाजवी फी आकरणी न करणे बाबत सुचित केले असताना त्या कडे पूर्ण दुर्लक्ष करत मनमानी पणे फी आकारणी सुरु केली आहे ह्या शाळेचे प्रशासन पालकांच्या परिस्थितिचा कोणताही विचार करत नाही शाळेच्या मनमाणी कारभारा बाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आळा घालावा या साठी पत्र कार अशोक मंडलिक यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे या अगोदर ही अनेक जनांनी तक्रारी दाखल केल्या असताना ह्या शा ळेचा मनमानी कारभार चालुच आहे गट शिक्षण अधिकारी पंचाचत समीती राहुरी  यांनी तक्रारी प्राप्त होऊनही ह्या तक्रा रींककडे द...

वर्षानंतरही शेतकरी अनुदानापासून वंचित, प्रहारचे जिल्हा प्रशासनाला निवेदन*.

Image
  वर्षानंतरही शेतकरी अनुदानापासून वंचित, प्रहारचे जिल्हा प्रशासनाला निवेदन शेख युनूस अहमदनगर  /... मागील वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे या सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. शासनाने मोठ्या दिमाखात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून आनुदानात वाढ केली खरी. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन दि. २५ मे, २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी सन 2022 मध्ये सततच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर संपूर्ण राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा, कपाशी, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूल मंत्री व इतर शासनातील प्रतिनिधी यांनी प्रशासनातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, बि.डि.ओ यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन राहुरी तहसील क...

सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना*".

Image
 ** वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम*    *सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना*". * अहमदनगर प्रतिनिधी युनूस शेख*/.. . -         श्रीरामपूर    वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने चित्रपट सृष्टीतील पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांसाठी " वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड " देण्यात येणार असून त्यासाठी मराठी, हिंदी व इतर भाषेतील चित्रपट क्षेत्रात खालील विभागात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या प्रतिथयश व होतकरू कलाकारांना   वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड २०२३ " हा पुरस्कार देण्यात येणार आहे.               गीतकार, संगीतकार, निर्माता / निर्माती, स्पॉटबॉय, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, निर्मिती व्यवस्थापक, कॅमेरामन, मेकअपमन, गायक, गायिका, लाईटमन, नृत्य दिग्दर्शिका, कथा, पटकथा, संवाद लेखक, असिस्टंट कॅमेरामन, स्टील फोटोग्राफर, फोकस पुलर, कार्यकारी निर्माता, लोकेशन मॅनेजर, वाहतूक प्रमुख, कॅटरिंग प्रमुख, बॅकग्राउ...

म्हैसगाव येथील डॉ . सुभाष काकडे ज्युनियर कॉलेजचा शंभर टक्के निकाल

Image
  म्हैसगाव येथील डॉ . सुभाष काकडे ज्युनियर कॉलेजचा शंभर टक्के निकाल शेख युनूस अहमदनगर*/. राहूरी तालुक्यात असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हैसगांव येथील प्रसाद फाऊंडेशन संचलीत डॉ. सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी 2022  ते 2023 परीक्षेचा निकाल जाहीर होऊन शंभर टक्के निकाल मिळवत घनघनीत यश संपादन केले. डॉ. सुभाष काकडे पाटील महाविद्यालय येथील आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या तिन्ही शाखेचा निकाल हा 100% लागला  असून तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात या महाविद्यालयाचे नांव गाजत असून संपूर्ण उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन व कौतुक होत आहे. 2018 ते 2023 सलग सहा वर्षांपासून बारावी शाखेचा  निकाल आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स या शाखेचा  निकाल 100% लावत डॉ. सुभाष काकडे महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षीही 100% निकाल हाती घेत गगनभरारी मारली आहे. शेरी चिखलठाण येथील लोकप्रिय लोकनियुक्त डॉ. सुभाष बन्सी काकडे पाटील यांनी सन 2016 मध्ये म्हैसगांव येथे कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा पा...

शेतक-यांना दिवसा विज द्या व जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित द्या अन्यथा 5 जुन ला आंदोलन- सुरेशराव लांबे

Image
  अहमदनगर प्रतिनिधी शेख  युनूस - नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्युत महावितरणाने दुर्लक्ष  केल्यास व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरावा करावा व नादुरुस्त ट्रांसफार्मर कुठलीही वसुली न करता त्वरित देण्यात यावे, अन्यथा 5 जून रोजी विद्युत वाहकतार पकडून आंदोलन करण्याचे निवेदन नगर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांना बरोबर घेऊन जिल्हाध्यक्ष श्री विनोद सिंग परदेशी  यांच्या मार्गदर्शनाखाली विदुत महावितरण अधिक्षक अभीयंता श्री.प्रकाश खांडेकर साहेब यांना देन्यात आले असल्याची माहीती प्रहार जनशक्तीपक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिली. पुढे बोलताना लांबे यांनी सांगीतले ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी वर्ग 4 वर्षापासुन भयानक अडचणीत आला असुन रात्रीच्यावेळी विषारी साप व वाघ व ईतर जंगली प्राणी यांच्या हल्यामुळे अनेक शेतक-यांना आपला प्राण गमवावा लागल्याने त्या कुटुबांवर अतिशय मोठे संकट आलेले आहे,ते संकट ईतरांनवर येऊनये त्यासाठी  शेतक-यांच्या शेतीपंपाला दिवसा १२ तास वीज देण्यात यावी जेणेकरून अशी दुर्दैवी वेळ कुठल्...

संगमनेर तालुक्यात आता बिबट्याच्या अवयवांची तस्करी

Image
  धक्कादायक बातमी ; संगमनेर तालुक्यात आता बिबट्याच्या अवयवांची तस्करी शेख युनूस अहमदनगर /.                             संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील बिबट्याचे अवयव विकणारी टोळीच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून बिबट्या मृगया या जातीच्या जनावराचे दात, सुळे, मिशा आशा पंचवीस अवयवांची खरेदी विक्री करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे तर एक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 19 मे 2023 रोजी हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ रात्री 9:45 च्या सुमारास घडली. यात आरोपी श्रीराम यादव सरोदे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर), सुधीर विजय भालेराव (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) हे अटक केले आहे तर सुशांत उत्तम भालेराव (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे. तर संगमनेर भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी ही दमदार कामगिरी केली आहे. आता अटक केलेले आरोपी यांनी हे अवयव आणले कुटून. कुठल्या बिबट्याचे हे अवयव आहे. यामध्ये आणखी कोण-कोण आहेत. याची कसून चौकशी वनविभाग करत आहेत. याचा पुढील तपास उपविभागीय वन अधिक...

कर्जुले पठार येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

Image
  संग्रहित फोटो  शेख  युनूस अहमदनगर.. दोन जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल. एक जण अटक तर दुसरा फरार. तेरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत      संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ_मोठे साठेबाज पठार भागात आहेत.या अवैध गुटखा विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कर्जुले पठार गावच्या शिवारातील अवैध गुटखा विक्रेत्यांवर मंगळवार दि. १६ मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण तेरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील एका आरोपीस अटक केली आहे तर दुसरा फरार झाला आहे.        अन्न व औषध प्रशासन विभागाने पठार भागात कारवाईचा बडगा उगारला असून एक गुटखा विक्रेत्याने गुटखा विक्रीचे उद्देशाने अवैध गुटखा साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर अधिकच्या चौकशीत दुसऱ्या अवैध गुटखा पुरवठादारास कारवाईची चाहूल लागताच तो पसार झाला आहे.सदर कारवाई अन्न व...

राहूरी तहसील कार्यालया समोर मुळा धरण प्रकल्पग्रस्त पीडित शेतकरी यांचे आमरण उपोषणाला यश

Image
  शेख युनूस अहमदनगर / .. केंदळ खुर्द चंडकापूर शिव रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी मुळा धरण प्रकल्पग्रस्त श्रीमती शेवबाई विठ्ठल दोंदे,आशोक विठ्ठल दोंदे व पवार कुटुंब यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर येथे नऊ दिवस बेमुदत आमरण उपोषण केले त्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री राजाभाऊ आढाव यमुनाताई भालेराव व प्रहार जनशक्ती पक्षाची राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील बाबासाहेब मकसारे भारत जगधने मच्छिंद्र धावडे केंदळचे सरपंच उपसरपंच सदस्य नागरिक व इतर अनेक पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन या सर्व पिढीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मुळाधरण प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना साठ वर्षात रस्ता पाणी नाही हे मोठे दुर्दैव लांबे केंदळ खु-चंडकापुर शिव रस्ता खुला करुण मिळण्या बाबतचे उपोषण अखेर 9 व्या दिवशी-अभियंता सायली पाटील यांनी मला 8 दिवस द्या,मि शिव रस्ता वरील पाणी चारी अनाधिकृत असेल तर स्थळ निरीक्षण करुण सर्व चौकशी करुण उपोषण कर्ते सर्व पिडीत शेतक-यांना न्याय मिळवुण देईल असे लेखी आश्वास देऊन लिंबु पाणी शरबत देऊन 80 वर्षाच्या आंजी व ईतर सहा पिडीत...

शंकर खेमनर यांचा या कुटुंबाने केला सत्कार

Image
 बॉम्बे टीव्ही व भाई  भाई रोपवाटीका साकूर यांच्या कुटूंबीयांच्या वतीने आदर्श सरपंच शंकर खेमनर यांचा जाहीर सत्कार * शेख युनूस अहमदनगर*/.. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या वतीने निवडणूक लढविण्यात आली असता या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा सभापती पदावर साकुर येथील आदर्श सरपंच शंकरराव खेमनर यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत   संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती पदावर यश संपादन केले. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाच्या पक्षाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. साकुर येथील शेतकरी पक्षाचे  खंबीर  कार्यकर्ते भाई भाई रोप वाटीकेचे मालक आल्लीभाई  मोमीन  व बॉम्बे टीव्ही चे  मालक लतीफ भाई मोमीन यांच्या कुटुंबियांच्या वतीने शंकरराव खेमनर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित भाई  भाई रोप वाटीकेचे मालक आल्लीभाई मोमीन, बॉम्बे टीव्ही व बॉम्बे इलेक्ट्रॉनिक चे मालक लतीफभाई मोमीन,आयुबभाई मोमीन आळेफाटा, निसारभाई पटेल, भैया ...

विरभद्र अपंग संस्थेच्या वतीने शंकरराव खेमनर यांचा जाहीर सत्कार

Image
  * शेख युनूस */.. अहमदनगर जिल्ह्यात गाजलेल्या संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर पठार भागातील आदर्श सरपंच शंकरराव पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा सभापती पदी निवड झाल्याने साकुर येथील विरभद्र अपंग ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी विकास मंडळाच्या पक्षाचे सर्व च उमेदवार मोठ्या मताधिक्याने बाजी मारत विजय संपादन केला. शंकरराव पाटील खेमनर यांनी या पूर्वी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती म्हणून चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि निर्मळ कामगिरी बजावत आपला ठसा उमटवत दुसऱ्यांदा सभापतीपदी बाजी मारली. या वेळी उपस्थित विरभद्र अपंग अपंग संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सागर, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ पुरी (गोसावी ), अहमदनगर जिल्हा पत्रकार युनूस शेख, युवा कार्येकर्ते शहानवाज मोमीन, आणि सामाजिक कार्येकर्ते दादाभाऊ खेमनर आदी मान्यवारांच्या उपस्थितीत शंकरराव खेमनर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

जखणगांव च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेले भव्य सभागृह इतर गावांना प्रेरणादायी

Image
  जखणगांव च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेले भव्य सभागृह इतर गावांना प्रेरणादायी -जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर  येथील ७ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी सिद्धाराम  शालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावात मोठा सभामंडप नसल्याने नागरिकांना प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमास पैसे मोजुन मांडव द्यावा लागत असे.यंदा तर गावातील अखंड हरिनाम सप्ताहात पावसाने पहिल्याच दिवशी फजिती केली. मांडव फाटला.सरपंच डाँ. सुनिल गंधे यांच्या मार्गदर्शनाखालीच गावातील कारागीर व तरूणांची फौज  कामाला लागली व अवघ्या ५० तासात ५०००स्केअरफुट चा भव्य दिव्य बहुद्देशीय सभागृह उभारण्यात आला. हा गावात मोक्याच्या ठिकाणी असुन सर्व जातीधर्माच्या लोकांचा हा उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. आज याचे लोकार्पण माननीय जिल्हाधिकारी शालीग्राम सालीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, प्रांताधिकारी सुधीर पाटिल जिल्हा प...

पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी डॉ. सादिक राजे तर विषय समित्यांवर शेलार, मते, औटी व शेख

Image
  पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी डॉ. सादिक राजे तर विषय समित्यांवर शेलार, मते, औटी व शेख अहमदनगर प्रतिनिधी. शेख  युनूस         पारनेर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सादिक बाल राजे यांची एकमताने नगरसेवकपदी निवड करण्यात झाली. तर विविध समित्यांमध्ये बांधकाम समितीच्या सभापतीपदी भूषण शेलार, पाणीपुरवठा समितीच्या सभापती योगेश मते, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदी नीता विजय औटी तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी जायदा राजू शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी १७ पैकी १४ नगरसेवक हजर होत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तीन बंडखोर नगरसेवक गैरहजर होते. भाजपाचे एकमेव नगरसेवक अशोक चेडे हे महाविकास आघाडीच्या बरोबरच आहेत.       स्वीकृत नगरसेवक श्रीकांत चौरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपविभागीय अधिकारी श्री बालाजी क्षीरसागर व पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत डॉ. सादिक राजे यांचा एकमे...

शेरी चिखलठाण येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Image
  शेख  युनूस अहमदनगर /.. राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी  चिखलठाण येथील जिल्हा परिषद व अंगणवाडी क्रमांक 60. येथे छत्रपती शाहू महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली.     छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हा सन 26 जून 1874 मध्ये झाला. छत्रपती शाहू महाराज भोसले असे त्यांचे पूर्ण नांव. राधाबाई ह्या माताश्री  व आबासाहेब घाटगे पिताश्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धांगिनी महाराणी  लक्ष्मीबाई भोसले. छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजे होते. एकवेळ गादी सोडेन पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्ये सोडणार नाही असे त्यांचे वक्तव्यय नेहमी असे. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक वायळ सर, दूधवडे सर, शाळेय विदया्र्थी शेरी अंगणवाडी सेविका मदतनीस काकडे मंगल, शेख  बिस्मिल्ला तसेच समस्त पालक वर्ग आणि  चिखलठाण जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रोडे सर, राजाराम काकडे सर, नरवडे मंगल मॅडम, बारवे सर, बाचकर सर, सारोकते सर, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी यांना प्रगती पत्रक देण्यात आले, उत्तीर्ण विदयार्थी यांचे...

विश्वासात न घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव - सुरेशराव लांबे पाटील

Image
  शेख युनूस अहमदनगर राहुरी - नुकत्याच पार पडलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित विकास मंडळाकडून मित्र पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे विकास महामंडळास पराभवाला समोरे जावे लागले असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की, या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विकास मंडळाचे बहुमत होण्याची परिस्थिती असताना मित्र पक्षाला विश्वासात न घेता योग्य उमेदवारांची निवड झाली नसल्याचे ते म्हणाले. आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन शेतमालाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला या निवडणुकीत भाजप प्रणित विकास महामंडळात सहभागी होण्याची इच्छा असतानाही मंडळाच्या अनेक नेत्यांशी चर्चा करून ही त्यांनी मित्र पक्षाला किंमत दिली नाही. त्यामुळे मला स्वतंत्र उमेदवारी करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे मतांची विभागणी झाल्याने अनेक उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र महाविकास आघाडीकडून ...

कामगार दिनानिमित्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
     शेख युनूस अहमदनगर १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील कामगारांनी या दिवशी आपल्या हक्कासाठी चळवळी केल्या होत्या. म्हणून जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी हा विशेष दिन आहे. याचेच औचित्य साधून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला.         सोमवारी सकाळी १ मे ला प्राथमिक आश्रमशाळेच्या प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी कामगार दिनाचे महत्त्व समजून  आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आश्रमशाळेतील शिपाई, कामाठी, मदतनीस आदी चतुर्थश्रेणी ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी चिखलठाण येथे 1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न.

Image
  शेख युनूस अहमदनगर.. . राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी  चिखलठाण येथील डोंगराळ दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.     1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वतंत्र मिळाले मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता, भारत  स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्ण पणे वेगळा होता. हळूहळू देशातील राज्ये, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि  तेव्हा पासून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो.मंगल देशा, पवित्र देशा,कणखर देशा,दगडा च्या देशा,नाजूक देशा, फुलांच्या देशाची स्थापना ही तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते   स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त रोवली गेली. महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जन जागृतीचे काम केले. कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 24 तास कामे करून घेतले...