कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी डॉ. सादिक राजे तर विषय समित्यांवर शेलार, मते, औटी व शेख

 


पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी डॉ. सादिक राजे तर विषय समित्यांवर शेलार, मते, औटी व शेख


अहमदनगर प्रतिनिधी. शेख  युनूस


       पारनेर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सादिक बाल राजे यांची एकमताने नगरसेवकपदी निवड करण्यात झाली. तर विविध समित्यांमध्ये बांधकाम समितीच्या सभापतीपदी भूषण शेलार, पाणीपुरवठा समितीच्या सभापती योगेश मते, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदी नीता विजय औटी तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी जायदा राजू शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी १७ पैकी १४ नगरसेवक हजर होत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तीन बंडखोर नगरसेवक गैरहजर होते. भाजपाचे एकमेव नगरसेवक अशोक चेडे हे महाविकास आघाडीच्या बरोबरच आहेत.

      स्वीकृत नगरसेवक श्रीकांत चौरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपविभागीय अधिकारी श्री बालाजी क्षीरसागर व पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत डॉ. सादिक राजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली.

     आ. निलेश लंके यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सादिक राजे यांनी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक योगेश मते, भूषण शेलार, अशोक चेडे, नितीन अडसूळ, डॉ विद्या कावरे, जायदा शेख, हिमानी नगरे, सुभाष शिंदे, डॉ बाळासाहेब कावरे, माजी नगरसेवक मुदस्सीर सय्यद, बाळासाहेब नगरे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करायच्या वेळेत डॉ. सादिक राजे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपविभागीय अधिकारी श्री बालाजी क्षीरसागर यांनी डॉ सादिक राजे यांची एकमताने निवड जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

      दुपारी ३ वाजता झालेल्या बैठकीमध्ये विविध समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या उपस्थित नगरसेवकांनी एकमताने 

बांधकाम समिती भूषण शेलार, पाणीपुरवठा समिती योगेश मते, आरोग्य समिती नीता विजय औटी तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी जायदा राजू शेख यांची निवड केली.

      या निवडलेल्या सभापती व स्वीकृत नगरसेवक यांचे पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी आमदार विजयराव औटी, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, नगरसेविका प्रियंका सचिन औटी, शुभम देशमुख, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, डॉ. सचिन औटी, विजय भास्कर औटी, राजू शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बंडु गायकवाड, उपाध्यक्ष रमिज राजे, विजय डोळ, अमित जाधव, अकील शेख, उमेश औटी, अमजद शेख, सलीम राजे, फिरोज राजे, वसीम राजे, बबलू राजे, अमन राजे, फहाद राजे, सुलतान शेख, विठ्ठल म्हस्के, मुख्याध्यापक संतोष ठाणगे, पप्पू कावरे, मौलाना अफजल, अहेमदअली मोमीन, मुदस्सर राजे, दानिश राजे, आरिफ मोमीन, दिलावर राजे आदींनी अभिनंदन केले. 



    मागील वर्षी पारनेर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर स्वीकृत नगरसेवकसाठी डॉ. सादिक राजे यांचे नाव आघाडीवर होते मात्र ऐनवेळी श्रीकांत चौरे यांना नगरसेवक केल्यानंतर आमदार लंके यांनी डॉ. सादिक राजे यांना पुढील वर्षी स्वीकृत नगरसेवक करू असा शब्द दिला होता. तो शब्द आमदार निलेश लंके यांनी पूर्ण केला.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु