कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

**वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम*
*सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना*".
*अहमदनगर प्रतिनिधी युनूस शेख*/...
-
श्रीरामपूर वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने चित्रपट सृष्टीतील पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांसाठी " वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड " देण्यात येणार असून त्यासाठी मराठी, हिंदी व इतर भाषेतील चित्रपट क्षेत्रात खालील विभागात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या प्रतिथयश व होतकरू कलाकारांना वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड २०२३ "हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गीतकार, संगीतकार, निर्माता / निर्माती, स्पॉटबॉय, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, निर्मिती व्यवस्थापक, कॅमेरामन, मेकअपमन, गायक, गायिका, लाईटमन, नृत्य दिग्दर्शिका, कथा, पटकथा, संवाद लेखक, असिस्टंट कॅमेरामन, स्टील फोटोग्राफर, फोकस पुलर, कार्यकारी निर्माता, लोकेशन मॅनेजर, वाहतूक प्रमुख, कॅटरिंग प्रमुख, बॅकग्राउंड म्युझीक, डबिंग प्रमुख, कलरिस्ट, हेअर ड्रेसर, एडिटिंग, नायक, नायिका, सहकलाकार, बाल कलाकार, खलनायक, खलनायिका, चरित्र कलाकार.
चित्रसृष्टीचाच भाग असलेल्या टेलिफिल्म, शॉर्ट फिल्म, वेब सिरीजमधील कलाकारही या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात.
सदर पुरस्कारात मानचिन्ह, सन्मानपत्र व वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशिपचा समावेश असेल. तरी इच्छुकांनी आपण केलेल्या कार्याचा सविस्तर तपशिल असलेला आपला प्रस्ताव ७ जून २०२३ पर्यंत wcpashrirampur@gmail.com या इमेल आयडीवर पाठवायचा असून ९०९६३७२०८२ दूरध्वनीवर संपर्क करायचा आहे. अशी माहिती डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे. प्रस्तुत पुरस्कार वितरण सोहळा एका रंगारंग कार्यक्रमात लवकरच होणार असल्याची घोषणाही डॉ. विघावे यांनी केली. डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टर को-ऑर्डीनेटर मेजर अशोकराव मोहिते, कार्यकारणी सदस्य सौ.बेबीताई बोईनवाड, मेजर रामदास शेळके, श्री. रूपचंद शिदोरे, श्री. दिपक म्हस्के, सचिव - महाराष्ट्र फिल्म सेना संघ तसेच वजीर शेख, हे विशेष प्रयत्नरत आहेत.
Comments
Post a Comment