कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

विश्वासात न घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव - सुरेशराव लांबे पाटील

 


शेख युनूस अहमदनगर


राहुरी - नुकत्याच पार पडलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित विकास मंडळाकडून मित्र पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे विकास महामंडळास पराभवाला समोरे जावे लागले असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की, या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विकास मंडळाचे बहुमत होण्याची परिस्थिती असताना मित्र पक्षाला विश्वासात न घेता योग्य उमेदवारांची निवड झाली नसल्याचे ते म्हणाले. आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन शेतमालाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला या निवडणुकीत भाजप प्रणित विकास महामंडळात सहभागी होण्याची इच्छा असतानाही मंडळाच्या अनेक नेत्यांशी चर्चा करून ही त्यांनी मित्र पक्षाला किंमत दिली नाही. त्यामुळे मला स्वतंत्र उमेदवारी करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे मतांची विभागणी झाल्याने अनेक उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव झाला.

मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या मित्र पक्षांना विश्वासात घेत उमेदवारी दिल्याने त्यांनी अल्प मतांनी विजय मिळवला. त्याप्रमाणे भाजप प्रणित विकास मंडळानेही या पुढील निवडणुकांमध्ये चुकांची पुनरावृत्ती न करता मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवाव्यात अन्यथा पुन्हा पराभवास समोरे जावे लागेल, असा सल्ला सुरेशराव लांबे पाटील यांनी मित्र पक्षाला दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु