कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनूस अहमदनगर
१ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील कामगारांनी या दिवशी आपल्या हक्कासाठी चळवळी केल्या होत्या. म्हणून जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी हा विशेष दिन आहे. याचेच औचित्य साधून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला.
सोमवारी सकाळी १ मे ला प्राथमिक आश्रमशाळेच्या प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी कामगार दिनाचे महत्त्व समजून आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आश्रमशाळेतील शिपाई, कामाठी, मदतनीस आदी चतुर्थश्रेणी कामगारांच्या हस्ते करून घेतला. अचानक आपल्या हाताने ध्वजारोहण होणार हे ऐकून सर्वच कर्मचारी व शिक्षक आश्चर्यचकित झाले. शिक्षक लतिफ राजे यांच्या मार्गदर्शनात चतुर्थ श्रेणी कर्मचारी तुकाराम सुंबे, बाबासाहेब काळे, संतोष आंबेडकर, विठ्ठल बाचकर, मच्छिंद्र चाबुकस्वार, संतोष ढोणे यांनी एकत्रित ध्वजारोहण केले.
https://youtu.be/JGjBEBA-4DE
अशाप्रकारे एक आगळ्यावेगळ्या उपक्रमातून महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आश्रमशाळा ढवळपुरी येथे संपन्न झाला.
Comments
Post a Comment