Posts

Showing posts from December, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Image
आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर घारगाव : संगमनेर तालुक्यातील मुळानदीवर असलेल्या आंबी-खालसा या बंधाऱ्यामधील लोखंडी ढापे चोरीला गेल्याची घटना ऑक्टोंबर महिन्यात घडली होती. त्यामुळे पाणी अडविणे शक्य नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व राजहंस दुध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष पाटील आहेर यांनी राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सुभाष पाटील आहेर यांनी सांगितले.         आंबी-खालसा गावच्या हद्दीत मूळा नदीवर घारगाव –आंबी हा कोल्हापूर पद्धीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग घारगाव,आंबी खालसा,सराटी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांना होतो. आंबी-खालसा येथील शेतकरी ऑक्टोंबर महिन्यात पाणी अडविण्यासाठी ढापे टाकण्यासाठी गेले असता त्यांना ढापे आढळून आले नाही. ढापे चोरीला गेल्याचे लक्षात येताच आंबीखालसा गावचे सरपं...

घारगांवात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Image
  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाअंतर्गत असणार्या गणेशवाडी येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथे विशाल प्रभाकर शेळके व आई विमल प्रभाकर शेळके हे दोघे राहत होते आई विमलबाई मोलमजूरी करत होती तर विशाल हा शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विशाल हा मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान घरी आला होता तर त्याने घरी आल्यानंतर राहत्या घराला आतमधून कडी लाऊन छताच्या लोखंडी  अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर आई विमलबाई ही कामावरुन घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू दरवाजा उघडत नसल्याने विमलबाई हीने आजुबाजुच्या नागरीकांना यांची कल्पना दिली. आजुबाजुच्या नागरीकांनी येऊन घराचा दरवाजा तोडला .तर आतमध्ये विशाल याने दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.नागरीकांनी तातडीने याबाबतची माहिती घारगांव पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक सुनिल...

साकुरसह चार ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

Image
  मतदारांचा कौल कुणाला?अखेर झेंडा कुणाचा फडकणार? प्रतीक्षा त्या दिवसाची. ( सतिश फापाळे )       संगमनेर तालुक्यातील पठार भागात साकुरसह चार गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे.येथे शंकर पाटील खेमनर यांच्या नेतृत्वात असलेले शेतकरी विकास पॅनल तर सुभाष पाटील खेमनर यांचे नेतृत्वात असलेले परिवर्तन विकास पॅनलची चुरशीची लढत होत आहे.ही राजकीय लढाई सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले वर्चस्व टिकविण्यासाठी प्रतिष्ठेची बनवली आहे.त्यामुळे साकुर गावात जोरदार प्रचार सभा संपन्न झाल्या आहेत.या प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचा खरपूस समाचार घेत आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या आहेत.अखेर शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.तर मतदार कुणाला कौल देणार? हे रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून समजणार असून आता फक्त मतदारांच्या मतदानाच्या प्रतीक्षेत सर्व उमेदवार असल्याचे दिसून येत आहे.        साकुसह चार ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी आणि सदस्य पदासाठी  रविवार दिनांक १...

बोटा गटात भावी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य कोण?

Image
  पठार भागाच्या राजकारणाला कलाटणी मिळणार का? ( सतिश फापाळे )          संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गट राजकारणाच्या दृष्टीने अग्रगण्य मानला जातो.या गटात भावी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे आतापासूनच  वेगाने वाहू लागले आहे.याची प्रचिती पठार भागात १४ डिसेंबर रोजी घारगाव येथे मोठ्या जनसंखेच्या उपस्थित युवा नेते गौरव डोंगरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठया थाटामाटात पार पडला आहे.यावेळी उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गौरव डोंगरे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देताना  आपली पक्षा अंतर्गत असलेली खदखद व्यक्त करत नाराजी दर्शविल्याने काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याने दिसून आल्याने इतर पक्षांना खतपाणी मिळाले असून याचा फायदा त्यांना होईल का?.अनेकांना यातून राजकीय बदलाची चाहूल लागली असल्याने आता भावी जिल्हा परीषद सदस्य,आणि पंचायत समिती सदस्य नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.               गौरव डोंगरे यांनी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांचे मार्गदर्...

अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

Image
  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली परीसरात महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे तर ही घटना बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.                 याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली शिवारातील नवीन घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मळकट कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर या इसमाच्या अंगात असुन तो  अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा आहे. सकाळच्या वेळेस दुध घालणार्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली पोलिस पाटील सुर्यवंशी यांनीही तातडीने घटनास्थळी जात पाहणी केली मात्र त्या इसमाची ओळख पटली नाही. याबाबतची माहिती सुर्यवंशी यांनी घारगांव पोलीस ठाण्यास दिली.घटनेची माहीती समजताच सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान हा इसम नेहमी भट...

ओतूर येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
  जागतिक अपंग दिनानिमित्त ओतुर (ता. जुन्नर )येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेल जुन्नर तालुकाच्या वतीने ओतुर या ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन केले त्या निमीत्त जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले, नायब तहसिलदार  सुरेश तिटकरे, सरपंच गीतांजली पानसरे,  गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी. ग्रामसेवक बाळासाहेब वनघरे तलाठी भाऊसाहेब अतुल विभुते आदि मान्यवर व विविध दिव्यांग संघटना पदाधिकारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते.         सदर कार्यक्रमात ओतुर ग्रामपंचायत यांच्याकडून दिव्यांगांना ५% निधीचा धनादेश देण्यात आला,  या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी हिरहिरिने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांचा सन्मान पदक देऊन यावेळी करण्यात आला.  यावेळी मोहित ढमाले, गीतांजली पानसरे, शरदचंद्र माळी, उत्तम डुकरे, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. शासकीय योजनांची माहिती व ग्रामपंचायत मार्फत गावचा विकास कसा करावा याची माहिती शरदचंद्र माळी यांनी दिली. सदर कार्यक्रमांसाठी अनेक दिव्यांग बांधव बहुसंखेने उपस्थित होते त्यांना अल्पोपहार, गुलाबपुष्प देऊन सत्कारसमारंभ करण्यात आला.   ...

ऐन कडक्याच्या थंडीत साकूर गावच्या राजकारणाचा पारा चढला.

Image
  साकुर ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण तापले. इच्छुक उमेदवारांचे एकूण ८० अर्ज दाखल. ( सतिश फापाळे) संगमनेर / तालुक्यातील पठार भागात राजकीय दृष्ट्या महत्वाची व सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणाऱ्या साकूर ग्रामपंचायतीच्या १८ जागेसाठी ७९ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापलेले दिसून येत असून मागील पंचवार्षिकचे सत्ताधारी पॅनल अधिक ताकतीने उमेदवारांची सुसूत्रता बैठकांचे सत्र राबवत निवडक उमेदवार दिलेले आहे.तर विरोधी पॅनलमध्ये सुसूत्रता व नियोजनाने उमेदवार देताना प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली दिसून आली आहे.उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून पुढील रणनीतीमध्ये विजयासाठी कोण कोण माघार घेणार यामुळे ऐन थंडीत राजकीय तापमानाचा पारा चढलेला  दिसून येत आहे.       साकुर ग्रामपंचायतमध्ये सदस्य व थेट सरपंचपदासाठी सोमवार दि. २८ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.२ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असताना ती संपलेली आहे. त्यानुसार सत्ताधारी शेतकरी विकास मंडळ व विरोधी परिवर्तन  ग...

एसएमबीटी ने बनवला जायफळापासून वेदनाशामक जेल

Image
  एसएमबीटी’च्या शिरपेचात मानाचा तुरा जायफळापासून बनवला वेदनाशमक जेल; पेटंट मिळाल्याने सर्वत्र कौतुक संगमनेर / इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एससमबीटी  कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश उशीर व प्राध्यापक डॉ सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. पुढील २० वर्षांपर्यंत या पेटंटचे ‘एसएमबीटी’कडे अधिकार असणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनामुळे मिळालेल्या या विशिष्ट पेटंटनंतर डॉ उशीर यांच्यासह एसएमबीटीमधील सहकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अधिक माहिती अशी की, लहानपणी आजी काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी वेदनाशामक असून शरीराची दुखणे कमी करण्यास रामबाण उपाय ठरू शकतात असे निदर्शनास आले.या संशोधनाबाबत अधिक माहिती देत डॉ...