कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

साकुर ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण तापले.
इच्छुक उमेदवारांचे एकूण ८० अर्ज दाखल.
(सतिश फापाळे)
संगमनेर / तालुक्यातील पठार भागात राजकीय दृष्ट्या महत्वाची व सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणाऱ्या साकूर ग्रामपंचायतीच्या १८ जागेसाठी ७९ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापलेले दिसून येत असून मागील पंचवार्षिकचे सत्ताधारी पॅनल अधिक ताकतीने उमेदवारांची सुसूत्रता बैठकांचे सत्र राबवत निवडक उमेदवार दिलेले आहे.तर विरोधी पॅनलमध्ये सुसूत्रता व नियोजनाने उमेदवार देताना प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली दिसून आली आहे.उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून पुढील रणनीतीमध्ये विजयासाठी कोण कोण माघार घेणार यामुळे ऐन थंडीत राजकीय तापमानाचा पारा चढलेला दिसून येत आहे.
साकुर ग्रामपंचायतमध्ये सदस्य व थेट सरपंचपदासाठी सोमवार दि. २८ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.२ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असताना ती संपलेली आहे. त्यानुसार सत्ताधारी शेतकरी विकास मंडळ व विरोधी परिवर्तन गटाकडून सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सरपंचपदाचे आरक्षण अनूसूचित जातीसाठी असून या जागेसाठी एकूण ६ अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये शेतकरी गटाकडून ४ तर परिवर्तन गटाकडून २ अर्ज दाखल करण्यात आले आहे. तसेच सदस्यपदासाठी एकूण ७९ अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये शेतकरी गटाकडून तब्बल ४९ तर परिवर्तन गटाकडून ३० अर्ज दाखल झाले आहे. ५ डिसेंबर २०२२ रोजी अर्जांची छाननी होणार आहे.
शंकर पाटील खेमनर शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व करत असल्याने शेतकरी विकास मंडळाच्या बाजूने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा ओघ दिसुन आला असल्याचे सर्व सामान्य जनतेमधून बोलले जात आहे. शंकर पाटील खेमनर यांच्या चाणाक्ष्य बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्व घटकांना सामावून घेत उमेदवार दिलेले दिसून आले आहेत. उमेदवार आघाडी मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत.आणि विजयाची वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे परिवर्तन मंडळाचे सुभाष पाटील खेमनर, बुवाजी पाटील खेमनर यांचे नेतृत्वात तितक्याच प्रभावीपणे टक्कर देणारे उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले आहे. आघाडी मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात रणनीती आखली जात आहे.आणि विजयाची वाटचाल करत आहे.
सर्व उमेदवार केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडून येतील.साकूरची जनता आमच्या सोबत आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे. आम्ही कुणालाही पोकळ आश्वासने दिली नसून पाचही वर्षं आणि दिवस रात्र जनतेसाठी झगडत राहिलो आहे. त्यामुळे काही चमकण्यासाठी उभे राहिले आहे तर काही आपले चमत्कार झाकण्यासाठी उभे राहिले आहेत. त्यांच्यावर साकूरकर कधीही विश्वास ठेवणार नाहीत.काही महिन्यांपूर्वी सोसायटीच्या निवडणुकीत सभा गाजवत विकासाची भाषा करणारे आता ग्रामपंचायत निवडणूकीतून माघारी घेऊन का पळाले. याचा अर्थ आपणास या निवडणूकीचा निकाल कळाला आहे.सोसायटीच्या निवडणुकीत साकूरच्या जनतेने तुम्हाला नाकारले म्हणूनच तुम्ही आज ग्रामपंचायत निवडणूकीतून माघार घेतली आहे.
इंद्रजीत पाटील खेमनर
चेअरमन वि.का.सोसायटी साकुर
Comments
Post a Comment