कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

जागतिक अपंग दिनानिमित्त ओतुर (ता. जुन्नर )येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेल जुन्नर तालुकाच्या वतीने ओतुर या ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन केले त्या निमीत्त जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले, नायब तहसिलदार सुरेश तिटकरे, सरपंच गीतांजली पानसरे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी. ग्रामसेवक बाळासाहेब वनघरे तलाठी भाऊसाहेब अतुल विभुते आदि मान्यवर व विविध दिव्यांग संघटना पदाधिकारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात ओतुर ग्रामपंचायत यांच्याकडून दिव्यांगांना ५% निधीचा धनादेश देण्यात आला, या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी हिरहिरिने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांचा सन्मान पदक देऊन यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन गोंविद ढमाले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल व त्यांचे सहकारी यांनी केले.सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले तर आभार पुणे जिल्हा दिव्यांग सेल सचिव शरद शिंदे यांनी मानले.
Comments
Post a Comment