कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

साकुरसह चार ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

 

मतदारांचा कौल कुणाला?अखेर झेंडा कुणाचा फडकणार? प्रतीक्षा त्या दिवसाची.


(सतिश फापाळे)


      संगमनेर तालुक्यातील पठार भागात साकुरसह चार गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे.येथे शंकर पाटील खेमनर यांच्या नेतृत्वात असलेले शेतकरी विकास पॅनल तर सुभाष पाटील खेमनर यांचे नेतृत्वात असलेले परिवर्तन विकास पॅनलची चुरशीची लढत होत आहे.ही राजकीय लढाई सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले वर्चस्व टिकविण्यासाठी प्रतिष्ठेची बनवली आहे.त्यामुळे साकुर गावात जोरदार प्रचार सभा संपन्न झाल्या आहेत.या प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचा खरपूस समाचार घेत आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या आहेत.अखेर शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.तर मतदार कुणाला कौल देणार? हे रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून समजणार असून आता फक्त मतदारांच्या मतदानाच्या प्रतीक्षेत सर्व उमेदवार असल्याचे दिसून येत आहे.

      साकुसह चार ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी आणि सदस्य पदासाठी  रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.याच पार्श्वभूमीवर साकुरसह, जांभूळवाडी, दरेवाडी, जांबूत,रणखांब ग्रामपंचायतमध्ये आपली सत्ता यावी.गावचे नेतृत्व करत विकास कामे करण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली अनेक उमेदवार राजकीय रणांगणात उतरले आहे.आपआपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तसेच आपल्या नेतृत्वाला पाठबळ देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला गेला आहे.यावेळी मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली तसेच प्रचारसभा संपन्न झाल्या आहेत.



      अशा या निवडणुकीच्या रणधुमाळीत शनिवार १० डिसेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलने सभा घेत साकूर गावामध्ये झालेल्या विकास कामांचा आढावा जनेतेसमोर मांडला तर या विकासकामांवर जनता समाधानी असून पुन्हा एकदा विश्वास टाकत जनता संधी देईल असा विश्वास दर्शवत विजय आजच आपला झाला असल्याचे बोलत विरोधकांना चिमटा काढला आहे.तर विरोधकांनी चुकीचा प्रचार केल्यास थेट विजयी सभेत सर्वच बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.तर विरोधी पक्षाच्या परिवर्तन विकास पॅनलने गुरुवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सभा घेत सत्ताधारी पक्षाच्या विकास कामांवर नाराजी दर्शविली आहे.यावेळी सुभाष पाटील खेमनर जनतेला संबोधित करत असतानाच  मुसळधार पाऊस सुरू झाला परंतु आपले भाषण न थांबवता सुभाष पाटील खेमनर यांनी साताऱ्यातील २०१९ च्या निवडणुकीचा दाखला देत राष्ट्रवादी पक्षाच्या सभेत शरद पवार यांनी आपल्या वयोमानाचा विचार न करता परिवर्तन घडवून आणणारे जे भर मुसळधार पावसात उभे राहून भाषण केले.याची आठवण करून देत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत भर पावसात टीकास्त्र सोडत विरोधकांना धो_धो धुतले आहे.जर जनतेने एकदा संधी दिली तर गावचा सर्वांगीण विकास करणारं असल्याचे आश्वासन दिले आहे.



       साकुर पठार भागात गेली अनेक वर्षापासून सत्तेवर राहत विकास कामे करत विकास गंगा वाहिली आहे का? तर दुसरीकडे विकासा पासून वंचित असलेल्याची परिवर्तनाची लाट उसळली आहे का? येथील ग्रामपंचायतीवर सत्ता जैसे थे राहते की परिवर्तन होते हे १८ डिसेंबरच्या मतदानातून सूनीच्छित होणार असून पठार भागात कुठल्या ग्रामपंचायतीवर कोणता झेंडा फडकणार या बाबीकडे संपूर्ण तालुक्याने लक्ष वेधले आहे.

गेल्या ३० वर्षांपासून शेतकरी विकास मंडळावर विश्वास दर्शवत साकुर ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवत वर्चस्व मिळवून देत वारंवार जनतेने संधी दिली आहे.या काळात विविध विकासकामे केली गेली आहेत.पुढील पाच वर्षांत देखील गावच्या सर्वांगीण विकासाचे काम करणार आहे.त्यामुळे आमच्या विकास कामांवर विश्वास ठेवत साकूरसह ,जांभूळवाडी, दरेवाडी, जांबुत, रणखांब या ग्रामपंचायतीवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाचा विजय निश्चीत आहे.


( शंकर पाटील खेमनर )

संचालक साखर कारखाना संगमनेर



 मला स्वतः निवडणूक लढवायची गरज वाटली नाही.कारण मी पदाचा लोभी नाही.साकूरमधील सर्व सामान्य नागरिकांना समान वागणूक आणि न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे.सर्व सामान्यांना संधी देऊन सर्व समावेशक उमेदवार ग्रामपंचायतवर निवडून आणून  दहशत मुक्त गाव करत समाजकारण आणि विकास करणार आहोत.यात विरोधकांची कामे देखील करणार आहे.

(सुभाष पातील खेमनर)

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु