कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

(सतिश फापाळे)
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गट राजकारणाच्या दृष्टीने अग्रगण्य मानला जातो.या गटात भावी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे आतापासूनच वेगाने वाहू लागले आहे.याची प्रचिती पठार भागात १४ डिसेंबर रोजी घारगाव येथे मोठ्या जनसंखेच्या उपस्थित युवा नेते गौरव डोंगरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठया थाटामाटात पार पडला आहे.यावेळी उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गौरव डोंगरे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देताना आपली पक्षा अंतर्गत असलेली खदखद व्यक्त करत नाराजी दर्शविल्याने काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याने दिसून आल्याने इतर पक्षांना खतपाणी मिळाले असून याचा फायदा त्यांना होईल का?.अनेकांना यातून राजकीय बदलाची चाहूल लागली असल्याने आता भावी जिल्हा परीषद सदस्य,आणि पंचायत समिती सदस्य नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गौरव डोंगरे यांनी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार धारेवर काम केले आहे.विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पदाची मोठी धुरा अंगा खांद्यावर पेलवताना अनेक अडीअडचणींना सामोरे गेले आहेत.एक लढवय्या योद्ध्या प्रमानें ही जबाबदरी पार पाडताना त्यांनी आपल्या उत्कृष्ठ कामगिरीतून युवकांचे उत्तम संघटन केले.विविध क्षेत्रात आपल्या बुद्धी कौशल्याने उत्तम प्रकारे काम करत असताना युवकांना मार्गदर्शन करत युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.यातून तरुणांची मोठी फळी निर्माण केली असून पठारावरील तळागाळातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात सामील होत. आपली नाळ तळागाळातील युवकांशी जोडत असंख्य युवकांच्या संघटनेची मोठी मोट बांधली आहे.याचीच प्रचिती त्यांचे वाढदिवसा निमित्त जमलेल्या जनसमुदायातून दिसून आली आहे.
अशा युवा नेत्याचा वाढदिवस साजरा करताना अनेक सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देताना तोंड भरून कौतुक केलं आहे.तर भावी वाटचालीस शुभेच्छा देताना राजकारणातील एक नवा चेहरा आणि उत्तम युवा नेता म्हणून काही कार्यकर्ते तसेच जनता कळतं नकळत का होईना परंतु भावी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील युवा उमेदवार म्हणून त्यांचेकडे पाहु लागली आहे.
तर यावेळी काही नेते नेते ,तसेच कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी वेगळा विचार केला आहे.तर वेळेला यावर भाष्य करणार असल्याचे सांगितले आहे. तर काही नेते पक्षाच्या आदेशानुसार काम करणारं असल्याचे बोलले गेले आहे.तर काहींनी गौरव डोंगरे यांना साथ देताना पक्षाचा रोष ओढवून घेण्याची वेळ आली तरी तय्यारी असल्याचे सांगितले आहे.तर काहींनी गेली पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे माजी सदस्यांवर विश्वास दर्शविला आहे.तर काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याचा फायदा घेत इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी देखील मोठ्या ताकतीनिशी तळागाळात पोहचत आपल्या भावी उमेदवारीची मोट बांधण्याचे काम देखील सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.तर येणाऱ्या निवडणूकीत काही नवे चेहरे देखील आपले नशीब आजमावणार आहे.परंतु गौरव डोंगरे यांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.
यावेळी काही काँग्रेस नेत्यांनी ,कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या अंतर्गत असलेली कुचबुज चव्हाट्यावर न आणता आपली खदखद व्यक्त करत नाराजी दर्शविली असल्याने पठार भागातील राजकारनात मोठी खलबत होत असून आता पठार भागातील राजकारण वेगळेच वळण घेत असल्याचे दिसत आहे.या भावी निवडणुकीत मोठा बदल होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.त्यामुळे पठारावरील जनतेला आता भावी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य नक्की कोण? हा प्रश्न पडला असून या चर्चेला आता पठार भागात उधाण आले आहे.
गौरव भाऊ एक उत्तम संघटक असून त्यांचे अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने बऱ्याचश्या कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आपली नाराजी दिसून आली आहे.मी देखील गेली अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून काम करताना मला बरेचशे अनुभव आले आहे. माझी देखील खदखद मी आत्ता व्यक्त करत नाही तशीच दाबून ठेवतो आहे.या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये होणारी धुसफुस पाहून आम्ही देखील काही कार्यकर्त्यांन समवेत वेगळा निर्णय घेतला आहे.गौरव भाऊचे उत्तम काम पाहून त्यांचे मित्र परिवाराने हा अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित केला आहे.हे राजकीय व्यासपीठ नाही. किंव्हा राजकारणाच्या दृष्टीने हा कार्यक्रम घेतलेला मला वाटतं नाही.वेळेला राजकीय व्यासपीठावर मी माझ्या कार्यकर्त्यांसह स्पष्ठ भूमिका जनतेसमोर मांडणार आहे.
(संतोष शेळके)
_माजी पंचायत समिती सदस्य
आमदार बाळासाहेब थोरात यांचे आदेशानुसार आम्ही दगडाला देव मानणारी निष्ठावान कार्यकर्ते आहोत.परंतु जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवी फळी निर्माण झाली आहे.आम्ही झोपलेले ज्वालामुखीच बरे आहोत.परंतु पठार भागाची जनता सोप्पी नाही.ज्याला डोक्यावर घेते त्याला पायाखाली देखील घालते.साहेबांच्या आदेशाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत.मग त्यांनी गौरव देऊ अथवा पुन्हा अजय देऊन आम्ही काम करत राहणार आहोत.गौरवने सर्व सामान्य कार्यकर्त्याना एकत्र करत मोठे संघटन केले आहे.त्यांना देखील भावी वाटचालीस शुभेच्छा.
(रमेश काका आहेर)
_संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास वाळुंज यांनी केले तर आभार सत्कारमूर्ती गौरव डोंगरे यांनी मानले.
Comments
Post a Comment