कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाअंतर्गत असणार्या गणेशवाडी येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथे विशाल प्रभाकर शेळके व आई विमल प्रभाकर शेळके हे दोघे राहत होते आई विमलबाई मोलमजूरी करत होती तर विशाल हा शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विशाल हा मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान घरी आला होता तर त्याने घरी आल्यानंतर राहत्या घराला आतमधून कडी लाऊन छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर आई विमलबाई ही कामावरुन घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू दरवाजा उघडत नसल्याने विमलबाई हीने आजुबाजुच्या नागरीकांना यांची कल्पना दिली. आजुबाजुच्या नागरीकांनी येऊन घराचा दरवाजा तोडला .तर आतमध्ये विशाल याने दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.नागरीकांनी तातडीने याबाबतची माहिती घारगांव पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक सुनिल पाटील पोलिस नाईक गणेश लोंढे, प्रमोद चव्हाण गणेश तळपाडे,, हरीचंद्र बांडे, नामदेव बिरे यांसह आदिंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरुन पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान विशाल शेळके यांच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून मी स्वतः आत्महत्या करत आहे व यास कुनासही जबाबदार धरू नये असे लिहीले होते. शेळके यांच्या दुःखद निधनाने घारगांव गावांसह परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment