कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर
घारगाव : संगमनेर तालुक्यातील मुळानदीवर असलेल्या आंबी-खालसा या बंधाऱ्यामधील लोखंडी ढापे चोरीला गेल्याची घटना ऑक्टोंबर महिन्यात घडली होती. त्यामुळे पाणी अडविणे शक्य नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व राजहंस दुध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष पाटील आहेर यांनी राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. आंबी खालसा येथील केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सुभाष पाटील आहेर यांनी सांगितले.
आंबी-खालसा गावच्या हद्दीत मूळा नदीवर घारगाव –आंबी हा कोल्हापूर पद्धीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग घारगाव,आंबी खालसा,सराटी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांना होतो. आंबी-खालसा येथील शेतकरी ऑक्टोंबर महिन्यात पाणी अडविण्यासाठी ढापे टाकण्यासाठी गेले असता त्यांना ढापे आढळून आले नाही. ढापे चोरीला गेल्याचे लक्षात येताच आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . मात्र, चोरट्यांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी झाले नाहीत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व राजहंस दुध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष पाटील आहेर, आंबी खालसाचे माजी उपसरपंच सुरेश कान्होरे यांनी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार केटीवेअरच्या ढाप्यांसाठी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मृद व जलसंधारण विभागाकडून या कामाचे ऑनलाईन टेंडर देखील काढण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरवात करण्यात येणार असून घारगाव, आंबी खालसा, सराटी, करवंदवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. यापुढे ढाप्यांची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतींची असणार आहे असेही यावेळी विखे पाटलांनी सांगितले.
पोलिसांनी शोध लावणे गरजेचे...
शासनाकडून केटीवेअर मंजूर झाले असले तरी चोरी गेलेले ढाप्यांचा शोध लागणे गरजेचे आहे. पोलिसांनी संबधित चोरीच्या संदर्भात संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलिसांना काही राजकीय दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- सुभाष पाटील आहेर .
( मा. व्हा चेअरमन राजहंस दुध संघ )
Comments
Post a Comment