कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली शिवारातील नवीन घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मळकट कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर या इसमाच्या अंगात असुन तो अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा आहे. सकाळच्या वेळेस दुध घालणार्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली पोलिस पाटील सुर्यवंशी यांनीही तातडीने घटनास्थळी जात पाहणी केली मात्र त्या इसमाची ओळख पटली नाही. याबाबतची माहिती सुर्यवंशी यांनी घारगांव पोलीस ठाण्यास दिली.घटनेची माहीती समजताच सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान हा इसम नेहमी भटकणारा, वेडसर असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment