Posts

Showing posts from June, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी क्र.60. मध्ये योग दिन साजरा

Image
  शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी क्र.60. मध्ये योग दिन साजरा शेख युनूस अ. नगर/.. शेरी चिखलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि अंगणवाडी क्र.60. मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रानी याला मान्यता दिली असून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसा पेक्षा मोठा असतो.21 जून रोजी उत्तरायण  संपून दक्षिणायण सुरु होते व या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते आणि सूर्योदय लवकर होऊन सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो, त्या मुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त होते. योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023साठी मानवता ही संकल्पना आहे. श...

दिंड्यांमधील वारकऱ्यांना पोलिसांचे संरक्षण कवच.

Image
  दिंड्यांमधील वारकऱ्यांना पोलिसांचे संरक्षण कवच. कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल खाकी वर्दीतील वारकरी .  आळेफाटा ( प्रतिनिधी -कैलास बोडके ) सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावर अत्यंत भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या पायी दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ  होत असताना आपल्याला दसून येत आहेत,  पालखी सोहळ्यामुळे अनेक जिल्ह्यातून  लाखो वारकरी विविध  तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने  विठ्ठलाच्या भेटी साठी असंख्य  भाविक भक्त व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी  येत असताना त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्यामुळे .कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिंड्यां मधील वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष  सूचना दिल्या असून त्यांनी  एव्हढ्यावरच न थांबता ते स्वतःही  प्रत्यक्ष महामार्गावर खाकी वर्दी तील वारकरी बनून या लाखो वारकऱ्यांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यां...

खबरदार' दारू पिऊन वाहन चालवत असाल तर

Image
 ' खबरदार' दारू पिऊन वाहन चालवत असाल तर  नशाबाज चालकांवर  ओतूर पोलिसांची करडी नजर. आळेफाटा -(प्रतिनिधी कैलास बोडके ) गेल्या काही महिन्यात नगर कल्याण महामार्गावर झालेले अपघात दारूची नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे  झाले असल्याचे एका पहानीत आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांची संख्यादेखील वाढली होती मात्र अशा नशाबाज वाहन चालकांवर ओतूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे संभाव्य अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे,ओतूर पोलिसांच्या  या कारवाईचे परिसरात स्वागत केले जात आहे.        ओतूर पोलिसांच्या वतीने ओतूर पोलीस  स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करत असताना तब्बल ४९ चालक  दारू पिऊन वाहन चालवत होते अशा नशाबाज  चालकांवर ओतूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे, या कारवाईमुळे गतवर्षी  झालेल्या अपघातांच्या तुलनेत  यंदा अपघातांचे प्रमाण निम्याने घटल्याचे निदर्शनास येत आहे.गेल्या वर्षी महामार्ग व परिसरात छोटे मोठे एकूण  ३६ अपघात घडलयाची नोंद आहे    तर या वर्षी  केवळ १८ अपघात घडले आहेत तसेच...

पिंप्रीअवघड ग्रा.पं.सरपंचपदी सौ प्रियंका बर्डे यांची बिनविरोध निवड

Image
  *शेख युनूस अ. नगर*   पिप्री अवघडच्या मावळत्या सरपंच सौ.परविनबानो बादशहा शेख यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वखुशीने गेल्या महीन्यात आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रीक्त झाल्यामुळे,मा तहसीलदार राहुरी यांनी पिप्री अवघड ग्रा.पं.नविन सरपंच पदाच्या निवडीसाठी आदेश काढुण अध्यासी अधिकारी म्हणुन श्रीम.वैशाली अंबादास सोनवणे मंडल अधिकारी राहुरी यांची नेमणुक करुन नियमाप्रमाने सर्व 9 सदस्यांना निवडीची नोटीस देऊन दिनांक 8 जुन रोजी सकाळी ठिक 10 वाजता नवनियुक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी पिंप्री अवघड येथील सर्व 9 ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलवली,यावेळी नविन सरपंच  निवडीच्या सभेला मावळत्या सरपंच सौ.परवीनबानो बादशहा शेख,सौ.रेखा बापु पटारे,सौ.प्रियंका विनोद बर्डे,सौ.मिनाक्षी सुर्यभान उर्फ सुरेशराव लांबे,श्री.शिवाजी सोपान लांबे, उपसरपंच श्री.बापु उर्फ लहानु सखाराम तमनर हे सहा सदस्य हजर होते तर तिन सदस्य गैरहजर होते  यावेळी सर्व निवडणुक कार्यक्रम अध्यासी अधिकारी यांनी पत्रकातील तपशीला प्रमाणे सुरवात केली,यावेळी पिंप्री अवघड लोकसेवा मंडळाचे प्रमुख व राहुरी तालु...

शेरी चिखलठाण येथे अहिल्यादेवी होळकर जयंती मोठया थाटामाटात संपन्न

Image
  शेख युनूस अ. नगर. . राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम डोगराळ भागात युवक तरुणांनी ढोल ताशाच्या तालावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आली. बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी चिखलठाण येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त म्हसकोबा वाडी येथून( म्हसकोबा मंदिर )येथून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ युवक,तरुणांनी विशेष सहभाग नोंदवला.अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक करण्यात आली. मिरवणूकीचा समारोह चिखलठाण येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आला.अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी यांचा आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महिलांना वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर जयंती वेळी रमेश फिरोदिया महाविद्यालय चे प्राध्यापक अस्वले सर यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते.अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त साहेबराव डोलनर यांनी अथक परिश्रम घेतले. सचिन काळनर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार रॉयल पाटील चे अशोकराव डोमाळे यांनी मानले. यावेळी उपस्थित रॉयल पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव डोमाळे,राजारा...

आश्विच्या धनश्री गव्हानेनी मिळवीले ९४.६०% गुण

Image
  संगमनेर /तालुक्यातील आश्वी येथील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द या विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला असून, कुमारी गव्हाणे धनश्री विकास, हीचा प्रथम क्रमांक आला आहे.   धनश्रीला एकूण 94.60℅ एवढे गुण मिळाले आहे, तर शाळेच्या वतीने तिचा गुण गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे, गरीब परिस्थितीची जाण असलेली धनश्री ही अत्यंत हुशार असून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केला आहे, या कामी शिक्षकांकडून तिचा कौतुक केले जात आहे तसेच, आश्वी परिसरामध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माझा आदर्श घेऊन बाकीच्या मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावं, आणि चार माणसांमध्ये आपल्या आई-वडिलांना माणूस म्हणून  जगावं या साठी प्रत्येक मुलीने चांगलं शिकलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तर शिक्षणाचा चांगला उपयोग करावा, असं धनश्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

म्हैसगांव केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील शेख शबनम ने 10 वी परीक्षेत घनघनीत यश मिळवीत बाजी मारली

Image
  म्हैसगांव  केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील शेख शबनम ने 10 वी परीक्षेत घनघनीत यश मिळवीत बाजी मारली शेख युनूस अ.नगर /.. राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी 10 परीक्षेत बाजी मारत आपल्या यशाचा ठसा उमटवीला आहे. श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगांव येथील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शना खाली 10 तील विद्यार्थ्यांना घण घणीत यश मिळवून आपल्या कर्तृत्वाचा, शैक्षणिक क्षेत्रात   नांव लौकिक केले आहे. 10 तील शेख शबनम हिने आपल्या खऱ्या मेहनतीने, जिद्दीने  मेहनतीने यश  मिळवत आपल्या शाळेचे, शिक्षकांचे,आणि    आपल्या आई वडिलांचे नांव मोठे केले. शबनम शेख हिने 500 पैकी 381 गुण मिळवत बाजी मारली.76.20% शबनम शेख हि आपल्या प्रतिकूल आणि सर्वसामान्य कुटुंबातील हुशार आणि  हून्हार मुलगी असून तीने कुटुंबातील कामकाजातून आपला अभ्यासक्रम यशस्वी करत 10 परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवत आपला ठसा उमटवाला असल्याने म्हैसगांव, शेरी चिखलठाण, राहूरी तालुक्यातील जनतेतून अभिनंदन व्यक्त हो...