कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी क्र.60. मध्ये योग दिन साजरा
शेख युनूस अ. नगर/.. शेरी चिखलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि अंगणवाडी क्र.60. मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रानी याला मान्यता दिली असून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता.
21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसा पेक्षा मोठा असतो.21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते व या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते आणि सूर्योदय लवकर होऊन सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो, त्या मुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त होते.
योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023साठी मानवता ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्व आहे अशी सविस्तर माहिती शिक्षक व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी आणि पालकांना दिली.
यावेळी उपस्थित दूधवडे सर,शिक्षिका विजया अडसूळ,अंगणवाडी क्र.60 च्या सेविका सौ. मंगल काकडे,मदतनीस बिस्मिल्ला शेख, व पालक वर्ग,आपासाहेब काकडे, एकनाथ काकडे,आणि अ. जिल्हा प्रतिनिधी शेख युनूस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment