कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

दिंड्यांमधील वारकऱ्यांना पोलिसांचे संरक्षण कवच.
कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल खाकी वर्दीतील वारकरी.
आळेफाटा (प्रतिनिधी -कैलास बोडके )सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावर अत्यंत भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या पायी दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना आपल्याला दसून येत आहेत, पालखी सोहळ्यामुळे अनेक जिल्ह्यातून लाखो वारकरी विविध तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटी साठी असंख्य भाविक भक्त व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी येत असताना त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्यामुळे .कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिंड्यां मधील वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष सूचना दिल्या असून त्यांनी एव्हढ्यावरच न थांबता ते स्वतःही प्रत्यक्ष महामार्गावर खाकी वर्दी तील वारकरी बनून या लाखो वारकऱ्यांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह कडक बंदोबस्तात संरक्षण देण्याचे काम करताना निदर्शनास आले आहे.याबाबत नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत समाधान देखील व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्याच्या टोकावरील कल्याण- नगर महामार्गावरून पायी पालख्या जात असताना त्यातील वारकऱ्यांच्या संरक्षनासाठी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पंढरपूरला जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्यातील प्रत्येकाच्या संरक्षणार्थ खबरदारी घेण्याविषयी पुणे ग्रामीण हद्दीतील असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष जबाबदारी दिली असून ते स्वतः देखील पुणे जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी उन्हात रस्त्यावर उभे राहून संरक्षण देत असल्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना खाकी वर्दीतील वारकऱ्यांचे दर्शन झाले त्यामुळे दिंडीद्वारे सर्व पायी जाणारे वारकरी निर्धास्तपणे मनोमन सुखावल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment