कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

'खबरदार' दारू पिऊन वाहन चालवत असाल तर
नशाबाज चालकांवर ओतूर पोलिसांची करडी नजर.
आळेफाटा -(प्रतिनिधी कैलास बोडके )
गेल्या काही महिन्यात नगर कल्याण महामार्गावर झालेले अपघात दारूची नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे झाले असल्याचे एका पहानीत आढळून आले आहे. त्यामुळे अपघातांची संख्यादेखील वाढली होती मात्र अशा नशाबाज वाहन चालकांवर ओतूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे संभाव्य अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे,ओतूर पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात स्वागत केले जात आहे.
ओतूर पोलिसांच्या वतीने ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी करत असताना तब्बल ४९ चालक दारू पिऊन वाहन चालवत होते अशा नशाबाज चालकांवर ओतूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे, या कारवाईमुळे गतवर्षी झालेल्या अपघातांच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण निम्याने घटल्याचे निदर्शनास येत आहे.गेल्या वर्षी महामार्ग व परिसरात छोटे मोठे एकूण ३६ अपघात घडलयाची नोंद आहे
तर या वर्षी केवळ १८ अपघात घडले आहेत तसेच दारू पिऊन वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या तीन चालकांवर कारवाई करण्यात आली होती तर या वर्षी ४९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शना खाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, हवालदार दत्ता तळपाडे, सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये यांनी केली असून अपघातांमध्ये घट करण्यास यश मिळविल्याबद्दल ओतूर पोलिसांप्रती कौतुक व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment