कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

म्हैसगांव केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील शेख शबनम ने 10 वी परीक्षेत घनघनीत यश मिळवीत बाजी मारली
शेख युनूस अ.नगर/.. राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी 10 परीक्षेत बाजी मारत आपल्या यशाचा ठसा उमटवीला आहे.
श्री. केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगांव येथील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शना खाली 10 तील विद्यार्थ्यांना घण घणीत यश मिळवून आपल्या कर्तृत्वाचा, शैक्षणिक क्षेत्रात नांव लौकिक केले आहे.
10 तील शेख शबनम हिने आपल्या खऱ्या मेहनतीने, जिद्दीने मेहनतीने यश मिळवत आपल्या शाळेचे, शिक्षकांचे,आणि आपल्या आई वडिलांचे नांव मोठे केले. शबनम शेख हिने 500 पैकी 381 गुण मिळवत बाजी मारली.76.20%
शबनम शेख हि आपल्या प्रतिकूल आणि सर्वसामान्य कुटुंबातील हुशार आणि हून्हार मुलगी असून तीने कुटुंबातील कामकाजातून आपला अभ्यासक्रम यशस्वी करत 10 परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवत आपला ठसा उमटवाला असल्याने म्हैसगांव, शेरी चिखलठाण, राहूरी तालुक्यातील जनतेतून अभिनंदन व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment