Posts

Showing posts from July, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर..

Image
  अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गटाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आली.  यावेळी प्रशासनाचे अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट व पंचायत समितीचे २० गण आहे. आज गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली.  जिल्हा परिषद गट पुढीलप्रमाणे... 1) समनापूर (सर्वसाधारण महिला),  2) तळेगाव (ना. मा. प्रवर्ग),  3) आश्वी बुद्रुक (एसटी महिला),  4) जोर्वे (सर्वसाधारण),  5) संगमनेर खुर्द (सर्वसाधारण),  6) घुलेवाडी (एससी महिला),  7) धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण महिला),  8) चंदनापुरी (सर्वसाधारण महिला),  9) साकुर (सर्वसाधारण),  10) बोटा (सर्वसाधारण). संगमनेर तालुका पंचायत समितीच्या २० गणांसाठी  संस्कार धोत्रे  वय 7 वर्षे  या मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तर  आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे 1) घुलेवाडी गण  --अनुसूचीत जाती  2) जोर्वे गण ---अनुसूचीत जाती महिला  3)साकुर गण --अनुसूचीत जमाती  4) अंभो...

सर्व सामान्यांचा आधारवड: अॅड मा.अमितजी धुळगंड

Image
  संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील  रहिवासी आदर्श व्यक्तीमत्त्व  एॅडवोकेट अमित धुळगंड यांचा वाढदिवस  आज मंगळवार दिनांक २६ जुलै रोजी मांडवे ग्रामस्थांच्या उपस्थिती साजरा होत आहे, मांडवें गावासाठी गोरगरिबांचे कैवारी म्हणून, अॅडवोकेट अमित धुळगंड यांची ओळख आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे वकीली पेशा सांभाळत असताना ते गावातील वाद गावातच मिटले पाहीजेत, सर्व सामान्य नागरिकांचा वेळ,पैसा वाचावा यासाठी धुळगंड हे नेहमी प्रयत्नवादी राहतात. व गावातील वाद ते गावातच मिटवतात.   अनेकांच्या शासन, प्रशासन स्तरावरील व इतर अडचणी सोडवून मोठी मदत करतात,   त्यामुळे गावातील एक सर्व समावेशक तरूण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं आहे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता ते जनतेचे काम करण्यासाठी अहोरात्र तत्पर  असतात, आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साकूर परीसराच्या वतीने साजरा होत आहे.  अश्या या अवलिया व्यक्तीमत्त्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

अरे बापरे...ते किराणा दुकान पुन्हा फोडले

Image
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील चौफुलीवरील किराणा दुकान फोडल्याची घटना बुधवार दिनांक २० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. तर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात किराणा सामानाची चोरी केली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की  उत्तम तात्याबा कुदनर यांचे साई किराना माॅल हे किराणा मालाचे दुकान साकुर येथील चौफुलीवरआहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी किराणा दुकानाचा पत्रा उचकाटून  माॅलमधील  बारा हजार दोनशे रुपये किमतीचे तेलाचे डब्बे, आठ हजार चारशे रुपये किंमतीची चहापावडरची बॅग, चार हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे स्प्रे व तीस हजार रुपये किमतीचा  इव्हिजन कंपनीचा  डी. व्ही .आर असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले आहे.   याबाबत उत्तम तात्याबा  कुदनर (राहणार शिंदोडी तालुका संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा  दाखल केला आहे तर  पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक  गोडे  करत आहे.

दुचाकी वाचविण्याच्या नादात पिक अप महामार्गावर उलटली : तर दुचाकीस्वार...

Image
  पठारवार्ता : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यानजीक पिक अपने विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला  धडक बसल्याने पिकअप महामार्गावर उलटल्याची घटना गुरवारी दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,किशोर आढाव राहणार सायखेडा नाशिक हे त्यांच्या ताब्यातील पिक अप क्रमांक एम एच १५ इ जी ही घेऊन आळेफाट्याकडून नाशिकच्या दिशेने चालले होते गुरवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ते आंबीखालसा परीसरात आले असता नारायण रामदास भागवत हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १४ एच इ ६८७१ ही घेऊन विरुद्ध दिशेने चालले होते. त्याच दरम्यान पिकअप व दुचाकींची धडक होऊन पिक अप महामार्गावर उलटली तरी दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भागवत हे जखमी झाले. घटनेची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमीला खासगी रुगणवाहीकेतून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठवले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सातपुते, ...

खासदार सदाशिव लोखंडेंच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी फासले काळे....

Image
    संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने संगमनेर येथील शिवसैनिकांनी खासदार लोखंडे यांचा तीव्र निषेध केला. लोखंडे यांच्यावर गद्दारीचा आरोप करत आता चांगल्या शिवसैनिकाला भविष्यात खासदारकीची उमेदवारी मिळेल या भावनेतून शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला . संगमनेर शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर हा निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेत असताना खासदार लोखंडेंनी कोणतेही काम केले नाही कोणत्याही शिवसैनिकांना मदत केली नाही व मतदार संघात कधी फिरकलेच नाही. मतदार संघातल्या लोकांच्या गाठीभेटी कधी घेतल्या नाही लोकांच्या सुख दुःखात कधीच गेले नाही आणि ते शिंदे गटात सामील झाले.  या गोष्टीचा निषेध व्यक्त केला व ते निघून गेल्यामुळे शिवसेनेला पोकळी नाही तर त्यांच्या जागी चांगला शिवसैनिक भविष्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल याचा आनंद शिवसैनिकांनी व्यक्त केला

कोटमारा धरण ओव्हरफ्लो ; शेतकऱ्यांना दिलासा

Image
        संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी जीवनवाहिनी समजले जाणारे कोटमारा धरण मंगळवारी (दि.१९ जुलै) ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या पाण्याचे पूजन काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  याप्रसंगी युवक काँग्रेसचे बाळासाहेब कुऱ्हाडे, बोटा गावच्या सरपंच सोनाली शेळके,कुरकुटवाडीच्या सरपंच नूतन कुरकुटे, उपसरपंच पांडू शेळके,बाळासाहेब कुरकुटे, माजी सरपंच विकास शेळके भिवाजी ढेरंगे, पोलीस पाटील शिवाजी शेळके, भाग्यश्री नरवडे, सयाजी ढेरंगे,अरुण कुरकुटे,बबन लामखडे,रामदास नरवडे,सुखदेव शेळके,दत्तात्रय पांडे,यशवंत शेळके,निखिल कुरकुटे,राहुल कुरकुटे,प्रमोद कुरकुटे,डॉ. सचिन मुसळे यांसह ग्रामस्थांची उपस्थित होते.         अकोले तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने बदगी बेलापूर हे धरण ओव्हरफ्लो झाले. हे पाणी पुढे कोटमारा धरणात आले. या धरणाच्या लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने एक महिना अगोदरच धरण तुडूंब भरुन वाहू लागले. त्यामुळे कुरकुटवाडी, बोटा,आंबी दुमाला,जाचकवाडी परिसरातील वाड्या - वास्त्यांवरील शेतकऱ्या...