कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अरे बापरे...ते किराणा दुकान पुन्हा फोडले


संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील चौफुलीवरील किराणा दुकान फोडल्याची घटना बुधवार दिनांक २० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. तर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात किराणा सामानाची चोरी केली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की  उत्तम तात्याबा कुदनर यांचे साई किराना माॅल हे किराणा मालाचे दुकान साकुर येथील चौफुलीवरआहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी किराणा दुकानाचा पत्रा उचकाटून  माॅलमधील  बारा हजार दोनशे रुपये किमतीचे तेलाचे डब्बे, आठ हजार चारशे रुपये किंमतीची चहापावडरची बॅग, चार हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे स्प्रे व तीस हजार रुपये किमतीचा  इव्हिजन कंपनीचा  डी. व्ही .आर असा एकूण ५४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले आहे.

 
याबाबत उत्तम तात्याबा  कुदनर (राहणार शिंदोडी तालुका संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा  दाखल केला आहे तर  पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक  गोडे  करत आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु