कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

खासदार सदाशिव लोखंडेंच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी फासले काळे....

 

 संगमनेर : खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने संगमनेर येथील शिवसैनिकांनी खासदार लोखंडे यांचा तीव्र निषेध केला. लोखंडे यांच्यावर गद्दारीचा आरोप करत आता चांगल्या शिवसैनिकाला भविष्यात खासदारकीची उमेदवारी मिळेल या भावनेतून शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.

संगमनेर शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर हा निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेत असताना खासदार लोखंडेंनी कोणतेही काम केले नाही कोणत्याही शिवसैनिकांना मदत केली नाही व मतदार संघात कधी फिरकलेच नाही. मतदार संघातल्या लोकांच्या गाठीभेटी कधी घेतल्या नाही लोकांच्या सुख दुःखात कधीच गेले नाही आणि ते शिंदे गटात सामील झाले.
 या गोष्टीचा निषेध व्यक्त केला व ते निघून गेल्यामुळे शिवसेनेला पोकळी नाही तर त्यांच्या जागी चांगला शिवसैनिक भविष्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल याचा आनंद शिवसैनिकांनी व्यक्त केला

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु