कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,किशोर आढाव राहणार सायखेडा नाशिक हे त्यांच्या ताब्यातील पिक अप क्रमांक एम एच १५ इ जी ही घेऊन आळेफाट्याकडून नाशिकच्या दिशेने चालले होते गुरवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ते आंबीखालसा परीसरात आले असता नारायण रामदास भागवत हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १४ एच इ ६८७१ ही घेऊन विरुद्ध दिशेने चालले होते. त्याच दरम्यान पिकअप व दुचाकींची धडक होऊन पिक अप महामार्गावर उलटली तरी दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भागवत हे जखमी झाले.
घटनेची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमीला खासगी रुगणवाहीकेतून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठवले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल भुतांबरे , पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली. दरम्यान महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सोनवणे, मनेश शिंदे ,बर्डे, उमेश गव्हाने आदि घटनास्थळी दाखल झाले.
Comments
Post a Comment