कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर..

 

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गटाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आली.  यावेळी प्रशासनाचे अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट व पंचायत समितीचे २० गण आहे. आज गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. 


जिल्हा परिषद गट पुढीलप्रमाणे...

1) समनापूर (सर्वसाधारण महिला), 

2) तळेगाव (ना. मा. प्रवर्ग), 

3) आश्वी बुद्रुक (एसटी महिला), 

4) जोर्वे (सर्वसाधारण),

 5) संगमनेर खुर्द (सर्वसाधारण), 

6) घुलेवाडी (एससी महिला), 

7) धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण महिला), 

8) चंदनापुरी (सर्वसाधारण महिला),

 9) साकुर (सर्वसाधारण),

 10) बोटा (सर्वसाधारण).


संगमनेर तालुका पंचायत समितीच्या २० गणांसाठी संस्कार धोत्रे वय 7 वर्षे या मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तर आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे




1) घुलेवाडी गण  --अनुसूचीत जाती 


2) जोर्वे गण ---अनुसूचीत जाती महिला 


3)साकुर गण --अनुसूचीत जमाती 


4) अंभोरे गण -- अनुसूचीत जमाती महीला 


5)निमोण गण -- ना.म.प्र.व्यक्ती  


6) समनापुर गण -- ना.म.प्र.महिला 


7) तळेगाव गण -- ना.म.प्र.महिला 


8) आश्वी खु.गण --ना.म.प्र.महिला.


9)वडगाव पान गण --ना.म.प्र.व्यक्ती 


10) कोकणगाव गण -- सर्वसाधारण व्यक्ती


11)आश्वी बु गण --सर्वसाधारण व्यक्ती


12) संगमनेर खुर्द गण --सर्वसाधारण व्यक्ती


13) गुंजाळवाडी गण --सर्वसाधारण महिला


14) राजापूर गण --सर्वसाधारण महिला 


15)धांदरफळ गण --सर्वसाधारण व्यक्ती 


16) चंदनापुरी गण -- सर्वसाधारण महीला 


17) पेमगीरी गण -- सर्वसाधारण महिला 


18) वरवंडी गण --सर्वसाधारण व्यक्ती 


19) खंदरमाळवाडी गण --सर्वसाधारण व्यक्ती 



20) बोटा गण --सर्वसाधारण महिला

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु