कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

कोटमारा धरण ओव्हरफ्लो ; शेतकऱ्यांना दिलासा



        संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी जीवनवाहिनी समजले जाणारे कोटमारा धरण मंगळवारी (दि.१९ जुलै) ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या पाण्याचे पूजन काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी युवक काँग्रेसचे बाळासाहेब कुऱ्हाडे, बोटा गावच्या सरपंच सोनाली शेळके,कुरकुटवाडीच्या सरपंच नूतन कुरकुटे, उपसरपंच पांडू शेळके,बाळासाहेब कुरकुटे, माजी सरपंच विकास शेळके भिवाजी ढेरंगे,
पोलीस पाटील शिवाजी शेळके,
भाग्यश्री नरवडे, सयाजी ढेरंगे,अरुण कुरकुटे,बबन लामखडे,रामदास नरवडे,सुखदेव शेळके,दत्तात्रय पांडे,यशवंत शेळके,निखिल कुरकुटे,राहुल कुरकुटे,प्रमोद कुरकुटे,डॉ. सचिन मुसळे यांसह ग्रामस्थांची उपस्थित होते.



        अकोले तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने बदगी बेलापूर हे धरण ओव्हरफ्लो झाले. हे पाणी पुढे कोटमारा धरणात आले. या धरणाच्या लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने एक महिना अगोदरच धरण तुडूंब भरुन वाहू लागले. त्यामुळे कुरकुटवाडी, बोटा,आंबी दुमाला,जाचकवाडी परिसरातील वाड्या - वास्त्यांवरील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पठार भागातील नेते मंडळीसह ,शेतकरी, ग्रामस्थांनी जलपूजन करत गंगा मातेला साडी चोळी अर्पण करून महाआरती घेत आपला आनंद व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु