Posts

Showing posts from November, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आमदार लहामटेंच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरणाचा भुमीपुजन समारंभ संपन्न

Image
  संगमनेर ( सतिश फापाळे ) तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील मुस्लिम कब्रस्तान भुमिपुजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पार पडला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून घारगांव येथे अल्पसंख्याक निधी अंतर्गत चौदा लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच या कब्रस्तानाचे सुशोभीकरण होणार आहे.   डॉ किरण लहामटे आमदार  तर यावेळी घारगांव गावच्या सरपंच अर्चना आहेर,आंबीखालसा गावचे बाळासाहेब ढोले,कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले, अल्पसंख्याक अध्यक्ष,मुन्ना शेख, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, ग्रामपंचायत सदस्य विजय धात्रक,हरूण शेख,घारगांव मुस्लिम जमात अध्यक्ष अकील शेख,अमीर शेख,आरीफ शेख,घारगांव मुस्लिम जमात उपाध्यक्ष जावेद शेख, जयहिंद यूवा मंच पठार भाग अध्यक्ष सुहास वाळुंज, अब्दूलहमीद शेख, संतोष नायकवाडी, इस्माईल मुजावर ,संदिप नाईकवाडी,सिकंदर मनियार,अशपाक पटेल,रफीक पठान, अशपाक पठान, मुख्तार शेख ,गुलाब नबी शेख, कासम बाबा शेख,यांसह आदि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

अखेर बावपठार येथे बिबट्या जेरबंद

Image
  अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास बावपठार येथील उसाच्या शेतात जेरबंद झाला आहे बिबट्या जेरबंद झाल्याचा व्हिडिओ   संगमनेर तालुक्यातील नांदूर गावा अंतर्गत असणार्या बावपठार शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव होते. शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांवर त्याने हल्ले केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.अखेर ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली होती गेल्या तीन चार दिवसांपूर्वी वनविभागाने बावपठार शिवारातील गोरक्षनाथ महादू भागवत यांच्या उसाच्या शेतात  पिंजरा लावला होता.तर त्या पिंजऱ्यात बकरू ठेवले होते अखेर भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अलगद त्यात अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतू अजूनही या परीसरात बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.तर यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे वनरक्षक श्रीकीसन सातपुते,कोरडे, रेश्मा जाधव आदिंनी धाव घेत बिबट्याला संगमनेर खुर...

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली,

Image
एक ठार; आठ जण गंभीर जखमी         संगमनेर / तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान महामार्ग ओलांडणाऱ्या  शाळकरी मुलीला वाचवताना  भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर   मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.       नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. या दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली गेली....

ग्रामीण भागातील तरुणाई सोशल मीडियावर भरकटली

Image
  बोटा_ सतिश फापाळे         ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसाय करतात.शेतकरी आपले मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार,चांगली नोकरी मिळावी यासाठी अहोरात्र शेतीत काबाडकष्ट करून होणाऱ्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.परंतु ग्रामीण भागातील तरुणाई आपले  भविष्यातील स्वप्न सोडून शिक्षण,अभ्यासापासून दूर जात असल्याचे निदर्शनास येत आहे.सोशल मीडियातील इन्स्टाग्राम,युटूब,व्हॉट्सॲप,फेसबुक अशा विविध अँपचा वापर अधिक प्रमाणात करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहून तरुणाई सुसाट भरकटत चालली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.       कोरोणा महामारी काळात ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये.म्हणून शेतकऱ्यांनी उसने पासने करत.तसेच कर्जावर स्मार्टफोन घेतला आणि मुलांचे हातात दिला.प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत मुले सजग झाली खरी परंतु सोशल मीडियातील विविध ॲप्सचा वापर करत अल्पवयीन मुले तरुण,तरुणी रिल्स, शॉर्ट स्टोरी बनविण्यात व्यस्त होत चालली आहे.आपले  स्टेटस,स्टोरी,व्हिडिओला लाईक, फॉलोअर्स वाढविण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू ...

जनार्दन आहेर कट्टर शिवसैनिकच..

Image
  गेल्या तीन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संगमनेर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यामध्ये तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांना तालुकाप्रमुख पदावरुन पायउतार करत  त्यांच्या जागेवरती नवीन तालुका प्रमुखाची नेमणूक करण्यात आली. मात्र, पदावरून पायउतार केल्याने जनार्दन आहेर पुढचा काय निर्णय घेणार? अन्य कोणत्या पक्षात जाणार का? शिवसेना सोडणार?  अशा विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु जनार्दन आहेर कट्टर शिवसैनिक असून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाही असे स्पष्टीकरण युवा सेना तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांनी दिले. ते संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  तसेच जनार्दन आहेर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली का असे माध्यमांनी विचारले असता त्यांची हकालपट्टी केली नसल्याचे गुलाबराजे भोसले यांनी सांगत चर्चेला पूर्णविराम दिला.  गुलाबराजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गटातील गावागावात तसेच घराघरात जनार्दन आहेर पोहचले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या आहेत. पदावरून प...