कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जनार्दन आहेर कट्टर शिवसैनिकच..

 



गेल्या तीन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संगमनेर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यामध्ये तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांना तालुकाप्रमुख पदावरुन पायउतार करत  त्यांच्या जागेवरती नवीन तालुका प्रमुखाची नेमणूक करण्यात आली. मात्र, पदावरून पायउतार केल्याने जनार्दन आहेर पुढचा काय निर्णय घेणार? अन्य कोणत्या पक्षात जाणार का? शिवसेना सोडणार?  अशा विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु जनार्दन आहेर कट्टर शिवसैनिक असून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाही असे स्पष्टीकरण युवा सेना तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांनी दिले. ते संगमनेर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 




तसेच जनार्दन आहेर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली का असे माध्यमांनी विचारले असता त्यांची हकालपट्टी केली नसल्याचे गुलाबराजे भोसले यांनी सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. 

गुलाबराजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गटातील गावागावात तसेच घराघरात जनार्दन आहेर पोहचले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या आहेत. पदावरून पायउतार करताना जनार्दन आहेर यांना साधी कल्पनाही देखील दिली नाही म्हणून तालुकाप्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या निर्णयाचे सर्व शिवसैनिकांना दुःख आहे. तसेच ज्या निवडी झाल्या त्यास आमचा विरोध नाही. मात्र, संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी जिल्हाप्रमुख, तालुक्यातील तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, गट, गण, शाखा प्रमुखांशी कुठलीही चर्चा न करता नुतन निवडी केल्या. 



आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना मान्य नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला त्यावर संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी संगमनेरला येवून मेळावा घेवून मग निर्णय घ्यावा. तसेच दोन वर्षांपूर्वी जनार्दन आहेर यांनी राजीनामा का दिला होता? याची साधी चौकशी केली का असा सवाल युवासेना तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांनी वरीष्ठांना विचारला आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु