कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास बावपठार येथील उसाच्या शेतात जेरबंद झाला आहे
बिबट्या जेरबंद झाल्याचा व्हिडिओ
संगमनेर तालुक्यातील नांदूर गावा अंतर्गत असणार्या बावपठार शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव होते. शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांवर त्याने हल्ले केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.अखेर ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली होती गेल्या तीन चार दिवसांपूर्वी वनविभागाने बावपठार शिवारातील गोरक्षनाथ महादू भागवत यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला होता.तर त्या पिंजऱ्यात बकरू ठेवले होते अखेर भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अलगद त्यात अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतू अजूनही या परीसरात बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.तर यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे वनरक्षक श्रीकीसन सातपुते,कोरडे, रेश्मा जाधव आदिंनी धाव घेत बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटीकेत नेण्यात आले .
Comments
Post a Comment