कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आमदार लहामटेंच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरणाचा भुमीपुजन समारंभ संपन्न

 


संगमनेर (सतिश फापाळे) तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील मुस्लिम कब्रस्तान भुमिपुजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पार पडला.


महाविकास आघाडीच्या माध्यमातून घारगांव येथे अल्पसंख्याक निधी अंतर्गत चौदा लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच या कब्रस्तानाचे सुशोभीकरण होणार आहे.


 डॉ किरण लहामटे

आमदार 

तर यावेळी घारगांव गावच्या सरपंच अर्चना आहेर,आंबीखालसा गावचे बाळासाहेब ढोले,कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगुले, अल्पसंख्याक अध्यक्ष,मुन्ना शेख, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, ग्रामपंचायत सदस्य विजय धात्रक,हरूण शेख,घारगांव मुस्लिम जमात अध्यक्ष अकील शेख,अमीर शेख,आरीफ शेख,घारगांव मुस्लिम जमात उपाध्यक्ष जावेद शेख, जयहिंद यूवा मंच पठार भाग अध्यक्ष सुहास वाळुंज, अब्दूलहमीद शेख, संतोष नायकवाडी, इस्माईल मुजावर ,संदिप नाईकवाडी,सिकंदर मनियार,अशपाक पटेल,रफीक पठान, अशपाक पठान, मुख्तार शेख ,गुलाब नबी शेख, कासम बाबा शेख,यांसह आदि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु