कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

बोटा_ सतिश फापाळे
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसाय करतात.शेतकरी आपले मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार,चांगली नोकरी मिळावी यासाठी अहोरात्र शेतीत काबाडकष्ट करून होणाऱ्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.परंतु ग्रामीण भागातील तरुणाई आपले भविष्यातील स्वप्न सोडून शिक्षण,अभ्यासापासून दूर जात असल्याचे निदर्शनास येत आहे.सोशल मीडियातील इन्स्टाग्राम,युटूब,व्हॉट्सॲप,फेसबुक अशा विविध अँपचा वापर अधिक प्रमाणात करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहून तरुणाई सुसाट भरकटत चालली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
कोरोणा महामारी काळात ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये.म्हणून शेतकऱ्यांनी उसने पासने करत.तसेच कर्जावर स्मार्टफोन घेतला आणि मुलांचे हातात दिला.प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत मुले सजग झाली खरी परंतु सोशल मीडियातील विविध ॲप्सचा वापर करत अल्पवयीन मुले तरुण,तरुणी रिल्स, शॉर्ट स्टोरी बनविण्यात व्यस्त होत चालली आहे.आपले स्टेटस,स्टोरी,व्हिडिओला लाईक, फॉलोअर्स वाढविण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे.परंतु आपले कारनामे पालकांना दिसू नये म्हणून पालकांना देखील ब्लॉक केले जात असल्याचे आढळुन येत आहे.
प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भाग देखील प्रगत होत चालला आहे.परंतु सोशल मीडियाचा अयोग्य वापर करत अल्पवयीन तरुण ,तरुणी अल्लड प्रेमाच्या गोष्टी रंगवत आहे.यातून अल्लड प्रेमी युगुल भविष्यातील स्वप्ने सोडून प्रेमाच्या जगात रंगू लागले आहे.यातून अल्पवयीन तरुण तरुणी पळून जाण्याचे प्रकार देखील वाढू लागले आहे. पालक देखील आपल्या मुलांचे कला गुण जोपासण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे.परंतु यातून आपल्या मुलाचे शिक्षण अधुरे राहणार नाही. याची देखील काळजी घेतली पाहिजे.आपली मुले सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करतात.काय व्हिडिओ बनवतात,काय स्टेटस ठेवतात.कुणाशी चॅटिंग करतात,सोशल मीडियाचा योग्य वापर करतात का? याकडे देखील पालकांनी आता लक्ष देणे गरजेचे आहे.
गुन्हेगारीकडे वाटचाल
सोशल मीडियातील विविध अँप वापरून फॉलोवर्स , लाईक वाढविण्याच्या नादात एकमेकांना खुन्नस देणारे स्टेटस, रील्स व्हिडिओ तयार केले जात आहे.यात प्रेम,सूडभावना तसेच पैसे मिळविण्याच्या नादात असले प्रकार केले जात आहे. याचे पर्यावसन गुन्हेगारीत होत आहे.यातून तरुणाई भाईगिरीचा नाद डोक्यात घालून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे स्टेटस द्वारे दिसून येत आहे.
फसवणुकीचे प्रकार
सोशल मीडियामध्ये अनेक फेक अकाउंट आहेत.यात सक्रिय स्कॅमर विविध ॲपच्या माध्यमातून तरुणांशी गोड गोड चॅटिंग करत एकमेकांना आपले मोबाईल नंबर शेअर केले जातात.यातून प्रेमाच्या गोष्टी रंगवत जाळ्यात ओढतात.व्हॉट्सॲप, अश्लील व्हिडिओ कॉल करत रेकॉर्ड केले जातात.हेच अश्लील व्हिडिओ पुन्हा तरुणांना व्हॉटसअँप द्वारे पाठवले जाऊन पैशाची मागणी केली जाते.अन्यथा सोशल मीडियावर तसेच फेसबुकवर, नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळले जात आहे.यातून तरुणांचे मानसिक संतुलन बिघडले जाते.आपली बदनामी रोखण्यासाठी उलाढाल करत असली प्रकरणे मिटविण्यासाठी होत असलेल्या हालचालींचे प्रकार समोर येत आहे.
आपली मुले सोशल मिडियाचा कसा वापर करतात हे पालकांनी जाणीवपूर्वक पाहणे आवश्यक आहे.यातून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचेशी सुसंवाद वाढविणे गरजेचे आहे.चांगले वाईट काय हे मुलांना योग्य मार्गदर्शन केले तर नक्कीच मुले भविष्य काळात योग्य मार्गावर प्रगती करतील.सद्ध्या सोशल मीडियावर स्कॅमर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.यातून अनेकांची फसवणूक होत असून मोठ्या रक्कमांची मागणी होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.असे प्रकार घडल्यास मुलांनी देखील पालकांशी सुसंवाद साधावा.तसेच पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन सोशल मीडियाचा योग्य वापर होईल याची काळजी घ्यावी.
(वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.योगेश फापाळे_आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ महाराष्ट्र)
विद्यार्थी मुले मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय राहत आहे.यात मोठ्या प्रमाणावर इन्स्टाग्राम,युटूब,व्हॉट्सॲप, फेसबुकचा वापर करतात.परंतु मुलांनी सोशल मीडियाचा वापर जनरल नॉलेज वाढविण्यासाठी तसेच योग्य माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी करावा.यात अनावश्यक फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात.मुलांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजे.त्यामुळे मुलांनी सोशल मीडियातून काय घ्यावे? काय टाळावे? याचे योग्य मार्गदर्शन आम्ही देखील करत आहोत.तसेच पालकांनी देखील मुलांशी सुसंवाद साधत योग्य मार्गदर्शन करावे.
(शिक्षक _शरद लामखडे _नाथाबाबा विद्यालय बोटा)
सत्य परिस्थिती.. वास्तववादी लेखन👌
ReplyDelete