कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात!
अकोले : (भाऊसाहेब वाकचौरे )तालुक्याच्या पूर्वेला प्रवरेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज प्रारंभ झाला. सकाळी पांडुरंगाची पूजा व ध्वजारोहण करून या पावन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऋषिपंचमी ते वराह जयंती २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य व गायनाचार्य सहभागी होणार आहेत.
या सप्ताहात हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, परभणी वारकरी भूषण अर्जुन महाराज मोटे पळशीकर, वारकरी रत्न ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव), विनोदाचार्य नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव), कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे (गेवराई) आदी मान्यवर कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. तसेच संस्कृतीताई वाकचौरे (कळस), कुंडलिक महाराज मोखरे (समशेरपूर), रोहिणीताई गडकरी (तुकाराम नगर), देवराम महाराज वाकचौरे (कळस), दीपक महाराज देशमुख (सुगाव), गणेश महाराज वाकचौरे (कळस), विष्णुपंत महाराज वाकचौरे (कळस) यांचे प्रवचन होणार आहे.
सोहळ्याच्या औचित्याने कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच मृदंगाचार्य संगीत अलंकार संकेत महाराज आरोटे, संगीत अलंकार किरण महाराज शेटे, संगीत विशारद अनिल महाराज रुपवते व प्रवीण महाराज पांडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
Comments
Post a Comment