कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

घारगाव ( नवनाथ गाडेकर )बोरबन-घारगाव परिसरात समाजाभिमुख आर्थिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व भव्य स्थलांतर सोहळा गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता उत्साहात संपन्न होणार आहे.
नवीन वास्तूत नवसंजीवनी, नवऊर्जेसह सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर (नाशिक) यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. महाराजांचे सायं. ५ ते ७ या वेळेत कीर्तन सेवा होणार असून, त्यांना श्री रामदास स्वामी वारकरी गुरुकुल, आणे यांची कीर्तनसाथ लाभणार आहे. त्यानंतर सायं. ७ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख कीर्तनकारांचा सन्माननीय सहभाग लाभणार आहे
या शुभक्षणी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कीर्तनकारांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष भाविकतेची जोड देणार आहे. यामध्ये,ह.भ.प. तुळशिराम महाराज सरकटे जुन्नर,ह.भ.प. गुरुवर्य भागवताचार्य अशोक महाराज जाधव, सावरगांवकर,ह.भ.प. यशवंत महाराज गाडेकर, घारगांव,ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर, माळेगाव पठार,ह.भ.प. रामप्रसाद महाराज कवडे, सुकेवाडीकर आदिंची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
"श्री गुरुकृपा नगर" – नव्या वास्तूचे नवे ठिकाण
संस्थेची नवीन वास्तू "श्री गुरुकृपा नगर स्टँड, सिदायकवाडी, वीज बोर्डाशेजारी, घारगांव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर" येथे साकारण्यात आली आहे. ही वास्तू केवळ संस्था चालवण्याचे ठिकाण नसून, भविष्यातील आर्थिक स्थैर्य व सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
विकासदृष्टीचा ठसा उमटवणारे नेतृत्व
या अभिमानास्पद कार्यामागे संस्थेचे अध्यक्ष मा. शांतारामशेठ गाडेकर व उपाध्यक्ष मा. सुरेश शेठ धोंडीबा गाडेकर यांचे नेतृत्व असून, सर्व संचालक मंडळ, महिला संचालिका, कर्मचारी वृंद व कार्यकर्त्यांचे समर्पण संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे मूळ ठरत आहे.
चेअरमन व्हा चेअरमन यांच्यासह संचालक राजेंद्र सिताराम गाडेकर,रामचंद्र बारकू गाडेकर,सचिन बबन गाडेकर,शांताराम दगडू वाव्हळ,सुनील बबन डोके,मोहन घमाजी मेंगाळ,चंद्रकांत भाऊ आरोटे,श्रीमती. रेखा हिरालाल चोपडा,सौ. आशा गोविंद गाडेकर यांसह आदिंनी या कार्यक्रमाला सर्व सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक, महिला , सामाजिक कार्यकर्ते व सर्वांनीच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
📌 कार्यक्रमस्थळ:
श्री गुरुकृपा नगर,( स्टँड, ) सिदायकवाडी सर्व्हिस रोड, वीज बोर्डाजवळ, घारगांव
🗓️ दिनांक: गुरुवार, ३१ जुलै २०२५
🕓 वेळ: सायंकाळी ४ वाजता उद्घाटन, ५ ते ७ कीर्तन, ७ नंतर स्नेहभोजन
---
Comments
Post a Comment