कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा
जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांनी चंदनापुरी येथील विठ्ठल विसावा या मंदिरपरिसरात स्वच्छता मोहीम राबवून उत्साहात साजरा केला . या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून ओंकार राठी तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता दूत आदित्य घाटगे व राजेश शहा यांना निमंत्रित केले होते मंचावर ज्येष्ठ छायाचित्रकार काशिनाथ गोसावी राम भागवत व शांताराम कोल्हे हे उपस्थित होते
प्रथम सकाळी 9 ते 11 या वेळेत विठ्ठल विसावा या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली त्या कामी यशस्वी फाऊंडेशन चे आदित्य घाटके व त्यांची कन्या यशस्वी घाटके यांनी अनमोल मदत केली नंतर फोटो, व्हिडिओ कॅमेरा चे पूजन करून पुष्पहार अर्पण करून पाहुणे व अध्यक्षांच्या मनोगताने कार्यक्रम संपन्न झाला
याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार निसर्ग देशमुख, कैलास खोले ,सतीश जम्बुकर, दीपक घुले, राम भागवत, राजू गुळवे, किरण डोंगरे, गोपाल बोराडे, संतोष शिंदे, प्रवीण थोरात, सुनील वायाळ, शहाजी काळे, निलेश शिंदे, तुकाराम भुसाळ, संतोष गाडे, गणेश यरमल, सोमनाथ आहेर, प्रकाश भालेराव, आरिफ सय्यद, वाल्मीक भास्कर, बंडू आमले, संतोष नाईकवाडी, गोविंद गोसावी, रमेश कापकर, पवन कडलक, नितीन खाटेकर, यांच्यासह संघटनेतील अनेक छायाचित्रकार याप्रसंगी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व उपाध्यक्ष कालीचरण पुरी यांनी परीश्रम घेतले अनिल कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले तर या कार्यक्रमाच्या जागा उपलब्धतेसाठी चंदनापुरीचे सरपंच अंकुश राहणे यांचीही अनमोल मदत झाली .
Comments
Post a Comment