कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय ढोकरे
संगमनेर (नवनाथ गाडेकर)तालुक्याच्या पठार भागातील कोठे खुर्द गावाअंतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील रहीवासी व बोटा गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांचे विश्वासू सहकारी अक्षय ढोकरे यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अक्षय ढोकरे हे समाजकार्य करत असतानाच अनेक वर्षांपासून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच बोटा गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत . सामाजिक काम करत असतानाच दांडग्या जनसंपर्काच्या आधारावर त्यांनी युवक वर्गाचे मोठ्या प्रमाणात संघटन केले आहे. कॉंग्रेस पक्षाचा सर्व समावेशक विचार ते युवाशक्ती पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.
या सर्वांची दखल घेऊन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी ढोकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करत मोठी जबाबदारी सोपवली आहे.तसेच संगमनेर तालुक्यात विविध पदांवर इतर पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी करण्यात आल्या आहेत.या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment