कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

वाढदिवस युवा समाजसेवक अष्टपैलूव्यक्तिमत्वाचा...

 वाढदिवस युवा समाजसेवक अष्टपैलूव्यक्तिमत्वाचा... 



स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ, शहाजीराजे भोसले अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हिंदुस्थानातील थोर क्रांतिकारक, स्वराज्याच्या जडण घडणीतील प्रत्येक मावळा, आईबाबांच्या विचार आणि संसकारांच्या माध्यमातून घडलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक आदर्श युवा समाजसेवक म्हणजेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र सबघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील. 

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, ग्रामीण भागातील बहुतांश गावातील नेटवर्क अडीअडचणी सोडविण्यात मोलाचे योगदान, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर, समाज जनजागृतीसाठी व्याख्यानांचे आयोजन, वृक्षलागवड, विविध सामाजिक उपक्रम,  छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीउत्सवानिमीत्त भव्य रक्तदान शिबीर तसेच भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, विविध शासकीय योजना, जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीरांचे आयोजन,  ग्रामीण भागातील पाणी, रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिके बरोबरच जिल्हापरिषद, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेगवेगळी आंदोलने, आमरण उपोषण, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत नातेवाईक आणि रुग्णांना आजारावर मात करण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपत बळ देण्याचे काम, मराठा आरक्षण विषयी स्पष्ट आणि आग्रही भुमिका, जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

सामाजिक शिवकार्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाॅल समाजरत्न पुरस्कार २०२१, राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक-२०२२, राज्यस्तरीय आदर्श जनसेवक-२०२३, राष्ट्रीय पातळीवरील इंडियन युथ आयकॉन पुरस्कार २०२३ या पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात करण्यात आलेले आहे. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन  तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु