कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त बिरेवाडी येथे भव्य बालसंस्कार / रक्तदान शिबीर संपन्न...
संगमनेर:- स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना तसेच बिरेवाडी ग्रामस्थांकडून दरवर्षी भव्य बालसंस्कार शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.
बिरेवाडी पंचक्रोशीतील बालक जास्तीत जास्त संख्येने या बालसंस्कार शिबिरात सहभागी होत असतात. वर्षानुवर्षे बालसंस्कार शिबिरात सहभागी होणाऱ्या बालकांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिर म्हणजे बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व विकास, समाजातील एक जबाबदार व्यक्तिमत्व घडण्यास तसेच सर्वांगीण विकासासाठी एक पर्वणीच ठरत आहे. शिवनेरी रक्तपेढी यांच्या सहकार्याने बिरेवाडी परिसरातील बहुसंख्य युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वश्रेष्ठ दान- रक्तदान शिबिरातही सक्रिय सहभाग नोंदवत रक्तदान केले. बालसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना नाश्ता व भोजन व्यवस्था ज्ञानदेव मोठ्याभाऊ ढेंबरे (माऊली उद्योग समूह) तसेच दिनकर देवराम ढेंबरे (हॉटेल गुरुदत्त) यांच्याकडून देण्यात आली.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांच्या संकल्पनेतून सदरचे भव्य बालसंस्कार शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवश्री शिवनाथभाऊ नाईकवाडी(अ.नगर जिल्हा संघटक, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य) यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. तसेच भव्य रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सर्वच रक्तविर आणि शिवनेरी रक्तपेढीची संपूर्ण टीम यांचे विशेष योगदान मिळाले.
यावेळी भाऊसाहेब ढेंबरे, अक्षय ढेंबरे, योगेश ढेंबरे, बाबाजी डोमाळे, संजय सागर, प्रकाश सागर, बाळासाहेब गळंगे, उत्तम भोसले, निलेश सागर, नवनाथ ढेंबरे, जालिंदर गुळवे, तुषार ढेंबरे, राजेंद्र ढेंबरे, अभय ढेंबरे, तसेच बिरेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान मिळाले.
Comments
Post a Comment