कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

दत्तात्रय आभाळे यांची महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
नवनाथ गाडेकर
संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील नांदुरखंदरमाळ येथील भगवती ग्रामविकास महीला मंडळ संचलित भगवतीमाता विद्यालयाचे सहशिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांची महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कारार्थी शिक्षक दत्तात्रय आभाळेशिक्षक आभाळे यांना त्यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या निवडीचे पत्र शिवस्वराज्य बहुउददेशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष समाज भुषण श्री संजय रामभाऊ वाघमारे यांनी नुकतेच पाठविले आहे.
हा पुरस्कार 29 मार्च 2024 रोजी श्रीराम साधना आश्रम, रामनगर मुकिंदपूर नेवासा फाटा तालुका नेवासा येथे विशेष मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षक दत्तात्रय आभाळे यांच्या पुरस्कार निवडीबद्दल भगवती ग्रामविकास महीला मंडळ पदाधिकारी,भगवतीमाता विद्यालय, मुख्याध्यापक,शिक्षक व सेवकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, विद्यार्थी पालक संघ, ग्रामस्थ नांदुर खंदरमाळ, दत्त देवस्थान ट्रस्ट अकलापूर पदाधिकारी, ग्रामपंचायत अकलापूर पदाधिकारी,आधार फौडेशन अकलापूर पदाधिकारी व ग्रामस्थ,माय मराठी अध्यापक संघ संगमनेर पदाधिकारी , शिक्षक व मित्रपरीवाराने अभिनंदन केले आहे.
( पठार वार्ता न्युज मिडीया संगमनेर)
Comments
Post a Comment