कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

सात शेतकऱ्याच्या विहिरीवरील केबली चोरी.
सव्वीस हजार रुपयांच्या मोटारींच्या केबली लंपास.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार पठार भागातील जांबुत खुर्द गावच्या शिवारातील मुळा नदीच्या तीरावरील सात शेतकऱ्यांच्या विहीरीतील मोटारींच्या केबली चोरी झाल्याची घटना मंगळवार दिनांक १८ जुलै रोजी उघडकीस आली आहे.
जांबुत खुर्द गावच्या लगत असलेल्या मुळा नदी पात्रातील केटीयर येथे जवळील शेती गट क्रमांक २६४ मधील विहिरीवरील मोटारींच्या सात शेतकऱ्यांच्या केबल अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहे.
जांबुत खुर्द गावच्या शिवारातील भानुदास पंढरीनाथ पारधी यांची पाच हजार रुपये किमतीची पोलीकॉप कंपनीची तीनशे फुट लांबीची सहा एम एम केबल,संजय सखाराम दुशिंगे यांची तीन हजार पाचशे रुपयांची पोलीकॉप कंपनीची दोनशे पन्नास फुट लांबीची पोलीकॉप कंपनीची सहा एम एम केबल,भाऊसाहेब गजाबा पारधी यांची पोलीकॉप कंपनीची तीन हजार पाचशे रुपयांची दोनशे पन्नास फुट लांबीची सहा एम एम केबल ,पोपट दशरथ पारधी यांची पोलीकॉप कंपनीची तीन हजार पाचशे रुपयांची दोनशे पन्नास फुट लांबीची सहा एम एम केबल , खंडु किसन पारधी यांची पोलीकॉप कंपनीची तिन हजार पाचशे रुपयांची दोनशे पन्नास फुट लांबीची सहा एम एम केबल,शंकर रामभाऊ पारधी यांची पोलीकॉप कंपनीची तीन हजार पाचशे रुपयांची दोनशे पन्नास फुट लांबीची सहा एम एम केबल, बाबाजी तुळशीराम शिंदे यांची पोलीकॉप कंपनीची तीन हजार पाचशे रुपयांची दोनशे पन्नास फुट लांबीची सहा एम एम केबल असा एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लबाडीचे इराद्याने,स्वत:चे फायद्याकरिता चोरुन नेल्या आहेत.कोणीतरी अज्ञात आरोपी अज्ञात चोरट्याने चोरून लंपास केला आहे.
याप्रकरणी भानुदास पंढरीनाथ पारधी यांचे फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार सहाय्यक फौजदार डी एम मरभळ करत आहे.
Comments
Post a Comment