कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पिंप्री अवघड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

 

शेख युनुस अहमदनगर : राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले.तसेच आदर्श विद्यार्थी तुषार कैलास पवार व श्रृती अनिल लांबे यांना  राहुरीचे गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन साहेब व प्रमुख पाहुणे उद्योजक सुनिल बनकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील लांबे यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा पिंप्री अवघड गावचे माजी सरपंच सुरेश पाटील लांबे  हे होते.  या कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून अहमदनगरचे उद्योजक सुनिल बनकर, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशालीताई नान्नोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव कांबळे साहेब, गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन साहेब,विस्तार अधिकारी श्री. अर्जूनराव गारूडकर साहेब, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारे सडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रविंद्र थोरात साहेब, पिंप्री अवघड गावच्या विद्यमान सरपंच परवीनबानो बादशाह शेख, उपसरपंच लहानू पाटील तमनर, पिंप्री अवघड सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील लांबे, व्हाईस चेअरमन पवार, माजी सरपंच सर्वश्री अनिल दोंड, बापूसाहेब पटारे, भाऊसाहेब पाटील गटकळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आफसाना युनूसभाई शेख, माजी अध्यक्ष पोपट शेंडगे, गावातील प्रतिष्ठित नागरिक जालिंदर पवार, तसेच तालुक्यातील व जिल्हातील बहुसंख्य शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बबन कुलट ,शाळेतील  सर्व शिक्षक तसेच गोटुंबा आखाडा शाळेतील अनिता मोरे मॅडम यांनी विशेष मदत केली.विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी कु. भाग्यश्री बोर्डे मॅडम, छाया पानसरे मॅडम व संगिता बेदरे मॅडम, गंगाधर जवरे सर, बबन गाडेकर सर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बबन कुलट सर यांनी केले.सूत्रसंचालन अनिल कल्हापुरे सर ,शिवाजी नवाळे सर ,व अनिल पवार सर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु