कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ संपन्न
पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ चार मार्चला पारनेर तालुका पोलीस स्टेशन आणि पत्रकार बांधवांच्या आयोजकांच्या उपस्थित पार पडला
अत्यंत हुशार व्यक्तिमत्व म्हणून पोलीस निरीक्षक यांची ओळख आहे, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी पारनेर तालुका पोलीस स्टेशन येथे कारभार बघितला असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घनश्याम बळप यांच्याकडे पाहीले जात होते, तर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या . पारनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व आवैद्य धंदे, तसेच दारू वाळू, चोर यांना चांगल्या प्रकारे घनश्याम बळप यांचा धाक होता. तर त्यांची बदली झाल्याने पारनेर तालुक्यातील जनता भावनिक झाली होती. यापुढे देखील मी चांगलंच काम करणार असून, गोर गरीब जनतेला योग्य तो न्याय देईल, आणि आरोपींना चांगलाच धडा शिकवेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिले.
तर त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी.नगरसेवक विजुभाऊ औटी, महिला आघाडीच्या शिवसेना तालुकाप्रमुख प्रियंका ताई खिल्लारी, एडवोकेट अमित धुळगंड, तसेच पारनेर तालुक्यातील युवा नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment