कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

अहमदनगर प्रतिनिधीं /शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील म्हसकोबा वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी करून पोबारा केला.
सविस्तर माहिती अशी कि म्हसकोबा वाडी येथे इयत्ता 1 ते 4 पर्यंत शालेय विद्यार्थी हे वाडी वस्तीवरून येऊन शिक्षण घेतात. शाळेसाठी माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या निधीतून कॅम्पूटर मोनीटर, माऊस,संपूर्ण सटसह साहित्य दिले होते,या कॉम्पुटर द्वारे येथील विद्यार्थी शालेय शिक्षणाची माहित घेत होते त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन होत होते. रविवार दि. 26 मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी शाळेतील संगणक साहित्य चोरून पोबारा केला .शिक्षक शाळेच्या वेळेनुसार शाळेत आले असता त्यांना शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडल्याचे लक्षात आले त्या अंदाजावर त्यांनी चोरी झाल्याचे लक्षात आले असता तेथील शिक्षक मुख्याध्यापक डोमाळे बाळासाहेब यांनी तात्काळ सरपंच यांना फोनद्वारे शाळेतील चोरीची माहिती दिली असता त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क करत म्हसकोबा वाडी शाळेच्या चोरीच्या तपासासाठी पंचनामा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल केला असून राहुरी येथील पोलीस निरिक्षक डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल खेमनर ,सानप,हे करत आहे.
सदरील घटनेमुळे शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. यापुर्वी म्हसकोबा वाडी येथे नाथ म्हस्कोबा मंदिरातील साहित्य हे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते त्या चोरीचा तपास लागण्यापूर्वी च याच ठिकाणी पुन्हा शाळेत चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलीसांना आव्हान केल्याचे दिसत आहे.
Comments
Post a Comment